Shafali Verma: "...म्हणून हे शक्य झालं" इतिहास घडवणाऱ्या कप्तान शेफाली रडली

Shafali Verma Crying After Winning U19 Women World Cup Trophy
Shafali Verma Crying After Winning U19 Women World Cup Trophy

Ind vs Eng U19 Women World Cup: महिला अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या मुलींनी इतिहास रचला आहे. टीम इंडियाने शानदार कामगिरी करत सामना जिंकला. सामन्यानंतर कर्णधार शेफाली वर्मा भावूक झाली.

Shafali Verma Crying After Winning U19 Women World Cup Trophy
Jay Shah: भारतीय महिला संघाने वर्ल्डकप जिंकताच! जय शहांची मोठी घोषणा

चॅम्पियन बनल्यानंतर भारतीय संघाची कर्णधार शेफाली वर्मा खूपच भावूक झाली. शेफाली बक्षीस समारंभाच्या वेळी काही वेळ रडत राहिली. हा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शेफाली वर्माने एक दिवस आधी तिचा वाढदिवस साजरा केला होता, त्यामुळे विश्वचषक विजयाने तिचा वाढदिवस अधिक खास झाला.

सामना संपल्यानंतर शेफाली म्हणाली की, 'सर्व मुली ज्या प्रकारे परफॉर्म करत आहेत आणि एकमेकांना सपोर्ट करत आहेत त्यामुळे मी खूप आनंदी आहे. समर्थन कर्मचार्‍यांचे आभार, ज्या प्रकारे ते आम्हाला दररोज पाठिंबा देत आहेत सर्वांचे आभार. खेळाडूने मला खूप साथ दिली. मला हा सुंदर संघ दिल्याबद्दल बीसीसीआयचे आभार आणि चषक जिंकल्याबद्दल खूप आनंद झाला. (Shafali Verma Crying After Winning U19 Women World Cup Trophy)

Shafali Verma Crying After Winning U19 Women World Cup Trophy
Ind vs Eng U19 WC: हाच तो क्षण भारताच्या मुलींनी जिंकून घेतलं सारं...! - Video

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात धुमाकूळ घातला. भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत इंग्लंडचा संघ 17.1 षटकांत 67 धावांत गुंडाळला. भारताकडून पार्श्वी चोप्रा आणि तीतस साधूने 2-2 विकेट घेतल्या. त्यानंतर उर्वरित काम भारतीय फलंदाजांनी केले.

सामन्यात धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाने शानदार फलंदाजी केली, भारताकडून सोम्या तिवारी आणि गोंगडी त्रिशा यांनी 24-24 धावा केल्या, तर कर्णधार शेफाली वर्मानेही 15 धावा केल्या. भारतीय संघाने 14 षटकात 3 गडी गमावून 69 धावा करत विजय मिळवला.

Shafali Verma Crying After Winning U19 Women World Cup Trophy
Ind vs Eng: वर्ल्ड चॅम्पियन! टीम इंडियाने आफ्रिकेत उंचावली अंडर 19 ची ट्रॉफी; इंग्लंडला चारली धूळ

ICC ने प्रथमच अंडर-19 महिला विश्वचषक स्पर्धा आयोजित केली होती, जिथे प्रथमच भारतीय महिला संघाने इतिहास रचला आणि स्पर्धा जिंकली. या विजयानंतर अनेक दिग्गजांनी भारतीय महिला संघाचे अभिनंदन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com