esakal | Video: रोहित शर्मा फलंदाजी करताना अचानक चेंडू उसळला अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit-Bounce-Catch

Video: रोहित शर्मा फलंदाजी करताना अचानक चेंडू उसळला अन्...

sakal_logo
By
विराज भागवत

Ind vs Eng: ख्रिस वोक्सच्या पहिल्याच षटकात घडला हा प्रकार

Ind vs Eng 4th Test: भारत-इंग्लंड कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत असताना चौथ्या कसोटीत भारताची (Team India) सुरुवात खराब झाली. पहिल्या सत्रात भारताने दोन्ही सलामीवीर आणि एक अनुभवी फलंदाज गमावला. पहिल्या सत्रात रोहित शर्मा (Rohit Sharma) ११, लोकेश राहुल १२ तर चेतेश्वर पुजारा ४ धावांवर बाद झाला. नाणेफेकीनंतर फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला स्विंग गोलंदाजीने पुन्हा हैराण केला. तसेच, अचानक चेंडूला मिळणाऱ्या उसळीपुढे (Bounce) भारतीय फलंदाजांची पुन्हा एकदा तारांबळ उडाली. रोहित फलंदाजी करताना असाच एक प्रकार घडला.

हेही वाचा: कोहलीचा 'विराट' विश्वविक्रम; सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे

रोहित शर्मा संथ आणि संयमी खेळ करत होता. दोघेही धावांपेक्षा खेळपट्टीवर स्थिरावण्याकडे लक्ष देत होते. त्यावेळी दीर्घ काळाने संघात स्थान पटकावणाऱ्या ख्रिस वोक्सला गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आले. वोक्सने पाच चेंडू निर्धाव टाकले. सहाव्या चेंडू अनपेक्षित उसळला. चेंडूचा बाऊन्स रोहित शर्मालाही समजला नाही. त्याने चेंडू खेळण्यासाठी बॅट चेंडूच्या जवळ नेली, पण त्याच्या बॅटला लागून चेंडू थेट विकेटकिपरच्या हातात जाऊन विसावला. त्यामुळे रोहितची संयमी खेळी संपुष्टात आली.

हेही वाचा: रोहित शर्मा कर्णधार होऊ शकतो का? कोच रवी शास्त्री म्हणतात...

रोहितने ११ धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ राहुलही १२ धावांवर पायचीत झाला. DRSमध्ये पंचांचा कॉल (Umpires Call) अंतिम ठरल्याने भारताचा रिव्ह्यू शाबूत राहिला पण राहुलला माघारी जावे लागले. त्यानंतर चेतेश्वर पुजारादेखील जेम्स अँडरसनच्या स्विंग गोलंदाजीचा शिकार झाला. त्याला केवळ ४ धावाच करता आल्या. त्यानंतर विराटची साथ करण्यासाठी रविंद्र जाडेजाला पाठवण्यात आले. उजव्या हाताचे फलंदाज झटपट बाद होत असल्याने कदाचित फलंदाजी क्रमवारीत बदल केल्याचे काहींनी म्हटले. जाडेजाने सत्र संपेपर्यंत कोहलीला चांगली साथ दिली.

loading image
go to top