esakal | रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार होऊ शकतो का? कोच रवी शास्त्री म्हणतात...
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli and Rohit Sharma

रोहित शर्मा कर्णधार होऊ शकतो का? कोच रवी शास्त्री म्हणतात...

sakal_logo
By
विराज भागवत

विराट आणि रोहित यांच्यातील कथित वादावर मांडलं रोखठोक मत

भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत तीन सामन्यांनंतर मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील ताळमेळाची चांगलीच चर्चा रंगली आहे. रोहित आणि विराट मैदानावर एकमेकांशी चर्चा करताना दिसतात. आनंद व्यक्त करतानाही ते एकमेकांना त्यात समाविष्ट करून घेतात. या साऱ्या मुद्द्यांवर भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी महत्त्वाची विधाने केली. तसेच, भविष्यात रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार होऊ शकतो का? याबाबतही त्यांनी मत मांडले.

हेही वाचा: रोहित, विराट नाही; 'हा' फलंदाज जिंकवून देऊ शकतो कसोटी मालिका!

रोहित-विराट वादावर...

"रोहित आणि विराटमधला ताळमेळ अप्रतिम आहे. मी संघातील त्यांचा ताळमेळ आणि त्यांच्या खेळी एन्जॉय करतो. प्रत्येक संघात वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती असतात. आमच्या वेळी गावसकर आणि कपिल देव हे दोन महान खेळाडू भिन्न स्वभावाचे होते. आता आणखी कोणीतरी आहेत. पण तिच खरी क्रिकेटची आणि संघाची मजा आहे. कारण जर सगळ्यांची विचार करण्याची सारखी असेल तर संघ नवीन काही करूच शकत नाही. आणि रोहित-विराट यांच्यात वाद कधीच नव्हता असं माझं स्पष्ट मत आहे. मी त्यांच्यामध्ये बेबनाव किंवा वाद झालेला पाहिलेला नाही. ते दोघेही भारतीय संघाचे खूपच महत्त्वाचे आणि चांगले खेळाडू आहेत", असे रवी शास्त्री म्हणाले.

हेही वाचा: विराटला खाली ढकलून रोहित शर्मा Top 5मध्ये; जो रूट अव्वलस्थानी

रोहितच्या कर्णधारपदाच्या चर्चेवर...

रोहित शर्मा निर्धारित षटकांच्या सामन्यांसाठी टीम इंडियाचा कर्णधार होऊ शकतो, अशी चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. IPL मध्ये त्याने नेतृत्वगुण दाखवले आहेत. या चर्चांवरही रवी शास्त्रींनी उत्तर दिले. "मी संघाचा प्रशिक्षक आहे. माझ्याकडे संघ निवडीची किंवा कर्णधार निवडण्याची जबाबदारी देण्यात आलेली नाही. जेव्हा माझी प्रशिक्षकपदाची कारकीर्द संपेल त्यावेळी मी स्वत: या प्रश्नाचे उत्तर देईन. पण सध्या माझ्या कसोटी संघाचा कर्णधार विराट आहे आणि उपकर्णधार अजिंक्य आहे. टी२० आणि वन डेसाठी माझ्या संघाचा कर्णधार विराट आहे तर उपकर्णधार रोहित आहे. दोन्ही संघ अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. गेल्या पाच वर्षात टीम इंडिया ही कामगिरीत सातत्य राखण्यात सफल ठरत आहे. अशा वेळी कर्णधार बदलायला हवा की नको, याचा आम्ही विचारच करत नाही", अशी प्रतिक्रिया रवी शास्त्री यांनी दिली.

loading image
go to top