IRE vs IND: 1 विकेट घेत अर्शदीप सिंगने इतिहास रचला! बुमराहचा मोठा विक्रम काढला मोडीत

 arshdeep singh
arshdeep singhesakal

IRE vs IND Arshdeep Singh : आयर्लंडसोबत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने शानदार कामगिरी करत विजय मिळवला. या सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने आपला कर्णधार जसप्रीत बुमराहचा मोठा विक्रम मोडला आहे. आता तो आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम जसप्रीत बुमराहच्या नावावर होता.

 arshdeep singh
IRE vs IND: 'मी 10 वर्षांपासून...', पहिल्याच सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकल्यानंतर रिंकू झाला भावुक

भारत आणि आयर्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात अर्शदीप सिंगने केवळ एक विकेट घेतली. आयरिश सलामीवीर अँड्र्यू बालबर्नी चांगली फलंदाजी करत होता. त्याने 72 (51) धावांची खेळी खेळली होती. जर तो आणखी थोडा वेळ मैदानात असता तर सामना भारताच्या हाताबाहेर गेला असतो. पण त्यानंतर अर्शदीप सिंगने अँड्र्यू बालबिर्नीला आऊट केले आणि संघाने सुटकेचा नि:श्वास सोडला. या विकेटसह अर्शदीप सिंगने 50 टी-20 विकेट पूर्ण केल्या.

 arshdeep singh
IRE vs IND: 'ही तर मोठी डोकेदुखी...', मालिका जिंकल्यानंतरही कर्णधार बुमराह नाराज

अर्शदीपने 33 डावांत 50 टी-20 विकेट घेतल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये सर्वात जलद 50 विकेट घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम जसप्रीत बुमराहच्या नावावर होता, ज्याने 41 डावांमध्ये हा टप्पा गाठला होता.

दुसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेक जिंकून आयर्लंडने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. जिथे ऋतुराज गायकवाड (58), संजू सॅमसन (40) आणि रिंकू सिंग (38) यांच्या महत्त्वपूर्ण खेळीमुळे टीम इंडियाने 185/5 अशी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात यजमान आयरिश संघाला केवळ 152 धावांपर्यंत मजल मारता आली आणि भारताने हा सामना 33 धावांनी जिंकला. यासह मालिका 2-0 अशी खिशात घातली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com