IND vs NED मॅच आधी संघात मोठा बदल! शेवटच्या साखळी सामन्यासाठी 'या' युवा खेळाडूची टीममध्ये एट्री

IND vs NED: A big change in the Netherlands team in the match! Entry of 'this' young player into the team...
IND vs NED
IND vs NED Esakal

India vs Netherlands ICC World Cup 2023 :

भारतात खेळल्या जात असलेल्या एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीसाठी पात्र झाले आहेत. भारताने 8 सामने खेळले आहेत आणि ते सर्व जिंकले आहेत. आता 12 नोव्हेंबरला टीम इंडियाचा सामना नेदरलँडशी होणार आहे.

मात्र या सामन्यापूर्वीच नेदरलँड संघात मोठा बदल झाला आहे. नेदरलँडचा संघ आधीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी नेदरलँड संघात फेरबदल करण्यात आले आहेत. वेगवान गोलंदाज रयान क्लेन पाठीच्या दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर गेला आहे. त्याच्या जागी युवा नोआ क्रॉसला शेवटच्या सामन्यासाठी संघात संधी मिळाली आहे.

गुरुवारी टूर्नामेंट इव्हेंट टेक्निकल कमिटीने या बदलाला मान्यता दिली, म्हणजे क्रॉस रविवारी बेंगळुरूमध्ये भारताविरुद्ध खेळणार आहे.

नोआ क्रॉसने आपल्या देशासाठी फक्त एकच एकदिवसीय सामना खेळला आहे. जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्ध आयसीसी पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यात तो खेळला होता. दुसरीकडे, दुखापतग्रस्त खेळाडू रयान क्लेनने या स्पर्धेत नेदरलँडकडून फक्त एकच सामना खेळला आहे.

नेदरलँडचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. सध्याच्या वर्ल्ड कपच्या गुणतालिकेत संघ 4 गुणांसह 10व्या स्थानावर आहे. भारताविरुद्धचा सामना नेदरलँड्ससाठी वर्ल्ड कपच्या दृष्टिकोनातून नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पात्रता गाठण्यासाठी महत्त्वाचा आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरण्यासाठी त्यांना भारताविरुद्ध मोठा विजय नोंदवावा लागेल. कारण त्याचा नेट रन रेट इतर संघांच्या तुलनेत खूपच खराब आहे. पराभव झाल्यास संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पात्रतेतून बाहेर पडेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com