Laxman angry on Rahane | IND vs NZ : अजिंक्य रहाणेवर संतापला VVS लक्ष्मण, म्हणाला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajinkya-Rahane

भारताची धावसंख्या पहिल्या दिवसअखेर ४ बाद २५८

IND vs NZ : अजिंक्य रहाणेवर संतापला VVS लक्ष्मण, म्हणाला...

sakal_logo
By
विराज भागवत

IND vs NZ: भारतीय संघाने पहिल्या दिवसअखेर प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २५८ धावांपर्यंत मजल मारली. श्रेयस अय्यर (नाबाद ७५), रविंद्र जाडेजा (नाबाद ५०) आणि सलामीवीर शुबमन गिल (५२) यांच्या अर्धशतकांच्या बळावर भारताने अडीचशेपार धावा केल्या. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही पहिल्या सामन्यात खेळत नाहीयेत. लोकेश राहुलही दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. अशा परिस्थितीत अनुभवी कर्णधार अजिंक्य रहाणे याच्यावर फलंदाजी विभागाची मोठी जबाबदारी आहे. पण त्याने केवळ ३५ धावा केल्यावर तो बाद झाला. त्याच्या खराब फटक्यावर भारताचा माजी क्रिकेटपटू VVS लक्ष्मण चांगलाच संतापला.

हेही वाचा: IND vs NZ : कानपूरच्या मैदानावर मुंबईकर क्रिकेटरचीच हवा!

"अजिंक्य रहाणे ज्या क्षणी फलंदाजीसाठी आला, तेव्हा कायल जेमिसनने काय केलं ते साऱ्यांनीच पाहिलं असेल. त्याने चेंडू टाकताना आखूड टप्प्याचा मारा सुरू केला. बाऊन्सर चेंडूंसाठी अजिंक्य रहाणेकडे केवळ पुल शॉट हेच उत्तर आहे. रहाणेची ही बाब साऱ्यांनाच माहिती आहे आणि त्याच फटक्यामुळे तो झेलबाद झाला. दक्षिण आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलियासारख्या ठिकाणी तुम्ही तसे चेंडू मारू शकता पण इथे तशा पद्धतीने खेळता येत नाही. त्याच गोष्टीमुळे तो बाद झाला. असे बेजबाबदार फटके प्रत्येक वेळी करणं योग्य नाही", अशी प्रतिक्रिया VVS लक्ष्मण याने व्यक्त केली.

हेही वाचा: IND vs NZ 1st Test शुबमन गिलचा अर्धशतकी 'चौकार'

दरम्यान, डावाच्या सुरुवातीला सलामीवीर मयंक अग्रवाल १३ धावांवर स्वस्तात माघारी परतला. चेतेश्वर पुजारा (२६) आणि अजिंक्य रहाणे (३५) या दोघांना चांगली सुरूवात मिळाली होती. पण त्यांना मोठी खेळी करता आली नाही. सलामीवीर शुबमन गिलने दमदार अर्धशतक ठोकलं, पण त्यानंतर ५२ धावांवर तोदेखील बाद झाला. त्यामुळे भारताची अवस्था ४ बाद १४५ अशी झाली होती. त्यानंतर पदार्पणाची संधी मिळालेला श्रेयस अय्यर आणि रविंद्र जाडेजा या दोघांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत फलंदाजी केली. दोघांनी आपापली अर्धशतके ठोकत नाबाद ११३ धावांची भागीदारी केली.

loading image
go to top