IND vs NZ : कानपूरच्या मैदानावर मुंबईकर क्रिकेटरचीच हवा! |India vs New Zealand, 1st Test Day 1 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shreyas Iyer

IND vs NZ : कानपूरच्या मैदानावर मुंबईकर क्रिकेटरचीच हवा!

sakal_logo
By
सुशांत जाधव

कानपूरच्या मैदानातील 'बादशहा' सुनील गावसकर यांच्या हस्ते कसोटी पदार्पणाची कॅप डोक्यावर चढवलेल्या श्रेयस अय्यरने कमालीची सुरुवात केलीये. आपल्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने दमदार अर्धशतक झळकावले आहे. कानपूरच्या मैदानात सुनील गावसकर यांचे तगडी रेकॉर्ड आहे. त्यांच्याकडून पदार्पणाची कॅप स्विकारलेल्या अय्यरनेही या मैदानातून धमाक्यात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे.

शुबमन गिल अर्धशतकी खेळी करुन परतल्यानंतर पुजारा-रहाणे या जोडीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र ही दोघेही चांगली सुरुवात मिळवूनही त्याचे मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात अपयशी ठरली. चहापानापर्यंत टीम इंडियाने 150 च्या घरात 4 गडी गमावले होते. जेमीसनच्या भेदक माऱ्यामुळे टीम इंडिया बॅकफूटला जातेय की काय? अशी भिती निर्माण झाली होती.

हेही वाचा: IND vs NZ : कानपूरच्या मैदानावर मुंबईकर क्रिकेटरचीच हवा!

संघ अडचणीत असताना मुंबईकर श्रेयस अय्यर संघाच्या मदतीला धावून आला. त्याने 94 चेंडूचा सामना करत अर्धशतकाला गवसणी घातली. पदार्पणातील त्याची ही खेळी टीम इंडियासाठी खूपच उपयुक्त अशी आहे. ठराविक अंतराने जेमीसन धक्क्यावर धक्के देत असताना श्रेयस अय्यरने संयमी खेळी करत संघाचा डाव सावरला. अय्यरला शतकी खेळी करुन पदार्पणाचा सामना आणखी अविस्मरणीय करण्याची संधी आहे.

हेही वाचा: CSK ची जय-वीरूची जोडी तुटणार तर धोनी खेळणार तीन हंगाम?

जेमिसनचा भेदक मारा अन्...

पहिल्या सत्रातील सुरुवातीलाच जेमिसनने मयंक अग्रवालल तंबूत धाडले. त्यानंतर शुबमन गिलने टीम इंडियाचा डाव सावरला. त्याने 93 चेंडूत 52 धावांचे योगदान दिले. उपहारानंतरच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर जेमिसनने शुबमन गिलला चालते केले. कर्णधार अजिंक्य रहाणे लयीत दिसत असताना पुन्हा जेमिसनने टीम इंडियाला धक्का दिला. तो 35 धावा करुन बाद झाला. टिम साउदीने पुजाराची विकेट घेतली.

loading image
go to top