Ricky Ponting on Iyer | IND vs NZ Test: श्रेयसला संघात स्थान; रिकी पॉन्टींग म्हणतो... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shreyas-Iyer-Ricky-Ponting

श्रेयस अय्यरने पदार्पणाच्या सामन्यातच लगावलं अर्धशतक

IND vs NZ Test: श्रेयसला संघात स्थान; रिकी पॉन्टींग म्हणतो...

sakal_logo
By
विराज भागवत

India vs New Zealand, 1st Test : भारताचा युवा फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यातून कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली. भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand Test Series) यांच्यात आजपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू झाली. त्यातील पहिली कसोटी कानपूरच्या मैदानावर खेळवण्यात येत असून त्यासाठी श्रेयस अय्यरला अंतिम संघात स्थान देण्यात आले. अजिंक्य रहाणेने नाणेफेक झाल्यावर Playing XI जाहीर केलं. त्यात श्रेयस अय्यरला संधी मिळाली. भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी अय्यरला टेस्ट कॅप दिली. त्याला मिळालेल्या संधीनंतर दिल्ली कॅपिटल्समध्ये त्याचा खेळ जवळून पाहिलेल्या रिकी पॉन्टींगने आपली प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा: IND vs NZ : कानपूरच्या मैदानावर मुंबईकर क्रिकेटरचीच हवा!

भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेट खेळणारा श्रेयस अय्यर ३०३वा खेळाडू ठरला. यंदाच्या वर्षी कसोटीत पदार्पण करणारा तो पाचवा भारतीय खेळाडू ठरला. त्याला मिळालेल्या संधीनंतर रिकी पॉन्टींगने एक ट्विट करत त्याचं अभिनंदन केलं. "गेल्या काही वर्षांमध्ये तू खूप चांगल्या पद्धतीने स्वत:चं क्रिकेट करीयर घडवत आहेस. तुला कसोटी संघात स्थान मिळणं हे तुझ्या श्रमाची पोचपावती आहे. ही तर फक्त सुरूवात आहे. मला तुझा अभिमान आहे", असं रिकी पॉन्टींगने ट्वीट केलं.

हेही वाचा: IND vs NZ 1st Test शुबमन गिलचा अर्धशतकी 'चौकार'

दरम्यान, पहिल्या दिवसअखेर भारताने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २५८ धावा केल्या. सलामीवीर मयंक अग्रवाल १३ धावांवर स्वस्तात माघारी परतला. चेतेश्वर पुजारा (२६) आणि अजिंक्य रहाणे (३५) या दोघांना चांगली सुरूवात मिळाली होती. पण त्यांना मोठी खेळी करता आली नाही. सलामीवीर शुबमन गिलने दमदार अर्धशतक ठोकलं, पण त्यानंतर ५२ धावांवर तोदेखील बाद झाला. त्यामुळे भारताची अवस्था ४ बाद १४५ अशी झाली होती. त्यानंतर पदार्पणाची संधी मिळालेला श्रेयस अय्यर आणि रविंद्र जाडेजा या दोघांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत फलंदाजी केली. दोघांनी आपापली अर्धशतके ठोकत नाबाद ११३ धावांची भागीदारी केली. त्यांच्या या खेळीच्या बळावरच भारताने २५८ धावांपर्यंत मजल मारली.

loading image
go to top