IND vs NZ: तिसऱ्या टी-20आधी संघाला मोठा धक्का, नेपियर सामन्यातून कॅप्टन बाहेर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs NZ 2022 Kane Williamson

IND vs NZ: तिसऱ्या टी-20 आधी संघाला मोठा धक्का, नेपियर सामन्यातून कॅप्टन बाहेर!

IND vs NZ 2022 Kane Williamson : न्यूझीलंड संघ नेपियरमध्ये भारताविरुद्ध तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना खेळणार आहे. याच्या एक दिवस आधी यजमान संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार आणि स्टार फलंदाज केन विल्यमसन या सामन्यातुन बाहेर गेला आहे. संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी ही माहिती दिली. विल्यमसनच्या बाहेर पडल्यामुळे किवी संघाला मोठा धक्का बसला आहे, कारण हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 ने पुढे आहे. पहिला सामना पावसामुळे वाहून गेला आणि दुसरा सामना भारताने 65 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला होता.

हेही वाचा: FIFA World Cup 2022 : इंग्लंडची सलामीची लढत आशिया खंडातील दादा इराण संघाशी

रविवारी 20 नोव्हेंबर रोजी माउंट माउंगानुई येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला. यजमानांसाठी कर्णधार केन विल्यमसनने सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने 52 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह 61 धावांची खेळी केली. आता तो नेपियर येथे होणाऱ्या तिसऱ्या टी-२० सामन्यात खेळू शकणार नाही. हा या मालिकेतील निर्णायक सामना देखील असेल कारण हा सामना गमावल्यानंतर किवी संघही मालिका गमावेल.

हेही वाचा : Shraddha Walker Case: वेबसीरीज ठरतेय का गुन्ह्यांचं गाइडबुक?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा सामना माउंट माउंगानुई येथे खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 6 गडी गमावून 191 धावा केल्या. टीम इंडियासाठी सूर्यकुमार यादवने 51 चेंडूत 111 धावांची नाबाद खेळी खेळली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 18.5 षटकांत सर्वबाद 126 धावांवर आटोपला. कर्णधार विल्यमसनने सर्वाधिक 65 धावा केल्या. भारताने हा सामना 65 धावांनी जिंकला. या सामन्यात सौदीने हॅट्ट्रिकही घेतली. त्याने सलग तीन चेंडूंवर हार्दिक पांड्या, दीपक हुडा आणि वॉशिंग्टन सुंदरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.