IND vs NZ : दूरदर्शन जोमात ॲमेझॉन कोमात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

DD Sports telecast match faster than Amazon Prime video

IND vs NZ : दूरदर्शन जोमात ॲमेझॉन कोमात

IND vs NZ 2nd T20I : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा टी-20 सामना खेळला जात आहे. जिथे नाणेफेक जिंकल्यानंतर यजमान किवी संघाने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारत आणि न्यूझीलंड मधील हा सामना ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ द्वारे लाईव्ह स्ट्रीमिंग होत आहे, पण यासाठी तुम्हाला ॲमेझॉनला पैसे मोजावे लागतील. मात्र हाच सामना दूरदर्शन वर फ्री दाखवला जात आहे.

हेही वाचा: IND vs NZ : भारत-न्यूझीलंड दुसरा T20 सामना हॉटस्टार नाही! येथे पाहा 'फ्री'मध्ये

OTT जमान्यात डाऊन मार्केट समजल्या जाणाऱ्या डीडी स्पोर्टकडे आपण सामना पाहण्यासाठी वळणार नाही. आपण भारत-न्यूझीलंड सामना ॲमेझॉन प्राईम वर पाहण्यासाठी अधिक प्राधान्य देत आहोत. मात्र इथेच आपण मोठी चूक करतोय.

सामन्याच्या प्रेक्षपण वेगाचा विचार केल्यास, आपण पैसे देऊन पाहणाऱ्या ॲमेझॉन प्राईम व्हिडिओही डीडी स्पोर्टच्या तुलनेने 4-5 मिनिटे मागे आहे. ॲमेझॉन प्राईम पिक्चर क्वालिटी विश्लेषक पॅनलरच्या बाबतीत जरी उजवं असलं तरी सामन्यांचे प्रक्षेपण लवकरात लवकर चाहत्यांना पर्यंत मोफत आणि वेगात पोचवण्यात डीडी स्पोर्ट आघाडीवर आहे.

हेही वाचा: KL Rahul: ठरलं! लवकरच अडकणार अथिया राहुल लग्नबेडीत; वडिलांनी दिली माहिती

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी 20 सामना पावासमुळे रद्द करण्यात आला. वेलिंग्टनमध्ये नाणेफेक होण्यापूर्वीच पावसाने सुरूवात केली. त्यामुळे एकही चेंडू न खेळवता सामना रद्द करावा लागला होता. आता रविवारी दोन्ही संघ माउंट माउंगानुई येथे भिडत आहे. हा सामना जिंकून भारतीय संघाला मालिकेत वर्चस्व गाजवायचे आहे. आता टी-20 मालिकेत फक्त दोन सामने शिल्लक आहेत. 22 नोव्हेंबरला नेपियर येथे तिसऱा टी-20 सामना खेळल्या जाणार आहे.