IND vs NZ : भारत-न्यूझीलंड दुसरा T20 सामना हॉटस्टार नाही! येथे पाहा 'फ्री'मध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs NZ LIVE Cricket Score Streaming

IND vs NZ : भारत-न्यूझीलंड दुसरा T20 सामना हॉटस्टार नाही! येथे पाहा 'फ्री'मध्ये

IND vs NZ LIVE Cricket Score Streaming : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसाने वाहून गेला. वेलिंग्टन येथे झालेल्या पहिल्या टी-20 मध्ये टॉस देखील होऊ शकला नाही. आता रविवारी दोन्ही संघ माउंट माउंगानुई येथे भिडणार आहेत. हा सामना जिंकून भारतीय संघाला मालिकेत वर्चस्व गाजवायचे आहे. आता टी-20 मालिकेत फक्त दोन सामने शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत रविवारी जिंकणाऱ्या संघाला 22 नोव्हेंबरला नेपियर येथे होणाऱ्या तिसऱ्या टी-20 सामना खेळल्या जाणार आहे.

हेही वाचा: Fifa World Cup 2022 : कतार झाले फुटबॉलमय...

टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दोन्ही संघ हरले होते. अशा परिस्थितीत त्या आठवणी विसरून संघांना नव्याने सुरुवात करायची आहे. भारतीय संघाची जबाबदारी कर्णधार हार्दिक पांड्यावर असणार आहे. मिशन 2024 टी-20 विश्वचषकासाठी तो महत्त्वाचा मानला जात आहे. अशा स्थितीत पांड्या टी-20 मध्ये कर्णधारपदाचा दावा करू इच्छितो. याशिवाय युवा खेळाडूही संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतील.

हेही वाचा: IND vs NZ : दुसरा T20 सामना देखील होणार रद्द ? जाणून घ्या हवामान...

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना अॅमेझॉन प्राइम वर प्रसारित केल्या जाणार आहे. आतापर्यंत भारतीय संघाचे बहुतेक सामने Sony Liv किंवा Hotstar वर पाहिले जात होते, परंतु यावेळी क्रिकेट चाहत्यांना सामन्याचा आनंद घेण्यासाठी अॅमेझॉन प्राइम डाउनलोड करावे लागणार आहे. डीडी स्पोर्ट्सकडे न्यूझीलंड दौऱ्यावर भारताचे टी-20 सामने प्रसारित करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे तुम्ही सामन्याचा विनामूल्य आनंद घेऊ शकता.