esakal | INDvsNZ : टी-20 सामन्यात भारताची सुपर ओव्हरमध्ये बाजी; रोहित ठरला हिरो !
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs NZ India won Third t20 match in super-over thriller
  • विजयाचा शिल्पकार रोहित शर्मा
  • सुपर ओव्हरमध्ये सामन्याचा निकाल

INDvsNZ : टी-20 सामन्यात भारताची सुपर ओव्हरमध्ये बाजी; रोहित ठरला हिरो !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हॅमिल्टन : तिसऱ्या टी-20 सामन्यात यजमान न्यूझीलंड आणि भारतामध्ये खूपच रंगतदार सामना झाला. सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाने बाजी मारली. सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने जसप्रित बुमराहच्या ओव्हरमध्ये १७ धावा चोपल्या आणि भारतासमोर एका षटकात विजयासाठी १८ धावांचे आव्हान ठेवले होते. त्याचा पाठलाग करताना प्रत्युत्तरात के एल राहुल आणि रोहित शर्मा या जोडीने १८ धावांचा पाठलाग केला. रोहित शर्माने शेवटच्या दोन चेंडूवर दोन षटकार ठोकले. या विजयासोबत भारताने पाच सामन्याची मालिका आधीच ३-० ने खिशात घातली आहे.


भारतीय संघाने दिलेल्या १८० धावाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचे सलामीचे फलंदाज मार्टिन गुप्टिल आणि मुनरो यांनी सावध सुरूवात केली. त्यानंतर गुप्टिलला शार्दुल ठाकूरने बाद केलं. गुप्टिल ३१ धावांची खेळी करत परतला. मार्टिन गप्टिलपाठोपाठ मुनरोही बाद झाला. डावाच्या दहाव्या षटकात किवींना तिसरा धक्का बसला असता परंतु, रविंद्र जडेजाकडून सँटनरचा सोपा झेल सुटला. त्यानंतर चहलने सँटनरला त्रिफळाचित केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सामना रंगतदार स्थितीत असताना न्यूझीलंडला चौथा धक्का बसला ग्रँडहोम अवघ्या पाच धावा काढून बाद झाला त्यानंतर न्यूझीलंडची सामन्यावरील पकड कमी झाली आणि सामना बरोबरीत सुटला. शेवटच्या षटकांत विजयासाठी ९ धावांची गरज असताना शमीने भेदक मारा करत सामना बरोबरीत सोडला. शमीनं विल्यम्सन आणि टेलरला बाद करत सामना बरोबरीत सोडविण्यात यश मिळवले.

भारत बंदला हिंसक वळण

तत्पूर्वी, टीम इंडियाला 20 ओव्हर्समध्ये 178 रन्सपर्यंत मजल मारता आली. भारताकडून केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. रोहित शर्मानं 40 बॉलमध्ये 65 तर, राहुलनं 19 बॉलमध्ये 27 रन्स केल्या. नाबाद 89 अशी चांगली सुरुवात करून देऊनही भारताला पुढं 200 धावांचा टप्पा गाठता आला नाही. पहिल्या दोन्ही मॅचमध्ये तुफान फटकेबाजी करणारा श्रेयस अय्यर या मॅचमध्ये फारशी फटकेबाजी करू शकला नाही. तर कोहलीलाही जेमतेम 38 रन्सच करता आल्या. शिवम दुबेला केवळ तीन रन्स करता आल्या.

loading image