esakal | भारत बंदला हिंसक वळण; पातूर व बाळापुरात दगडफेक
sakal

बोलून बातमी शोधा

balapur band 01.jpg

येथील एका हॉटेलवर सुद्धा दगडफेक करून काच फोडले. ऐवढेच नव्हे तर शिवसेनेचे शुभेच्छा बॅनरही फाडले.

भारत बंदला हिंसक वळण; पातूर व बाळापुरात दगडफेक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बाळापूर/पातूर (जि.अकोला) : सीएए व एनआरसी विरोधात बहुजन क्रांती मोर्चा व इतर संघटनांनी भारत बंद पुकारलेला आहे. या बंद दरम्यान अज्ञात समाजकंटकांनी आज (ता.29) बाळापूर व पातूर शहरात दगडफेक केली. या दगडफेकीचा परिणाम वाहतुकीवर झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, या घटनेमुळे शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

महत्त्वाची बातमी - शिवभोजन सोडा हे आहे मातोश्री भोजन, केवळ एक रुपयात

आज बुधवारी सीएए आणि एनआरसी विरोधात बहुजन क्रांती मोर्चाने बंदची हाक दिली आहे. या दरम्यान आज बाळापूर शहरातील बसस्थानक परिसरात काही जणांनी दगडफेक केली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रोहिनी सोळंके, प्रभारी ठाणेदार पडघन यांनी घटनास्थळी धाव घेतली. अतिरिक्त पोलिस अधीक्षकांनी बाळापुरात भेट दिली. दरम्यान, पोलिसांनी बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

आवश्यक वाचा - आमदार रोहीत पवार म्हणतात, शिवशंकरभाऊ हे मॅनेजमेंट गुरू

पातूरात दगडफेक; पोलिसांच्या लाठीचार्ज
याचप्रमाणे पातूर येथे संतप्त जमावाने एसटीवर दगडफेक केली. यावेळी एसटी बसमध्ये बसलेल्या एका महिला प्रवाश्‍याच्या डोक्याला बसचा काच फुटून लागल्याने ती जखमी झाली. तसेच येथील एका हॉटेलवर सुद्धा दगडफेक करून काच फोडले. ऐवढेच नव्हे तर शिवसेनेचे शुभेच्छा बॅनरही फाडले. यावेळी परिस्थितीत नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

loading image
go to top