KL Rahul Record | IND vs NZ: राहुलचा दणका! एक चौकार अन् एक षटकार लगावत रचला पराक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KL-Rahul-Batting

भारताने पहिल्या टी२० सामन्यात उपविजेत्यांचा केला पराभव

IND vs NZ: राहुलने एक चौकार अन् एक षटकार लगावत रचला पराक्रम

sakal_logo
By
विराज भागवत

IND vs NZ 1st T20 : पहिल्या टी२० सामन्यात विश्वचषक स्पर्धेचे उपविजेते न्यूझीलंडला भारताने शेवटच्या षटकात हरवले. ऋषभ पंतने मोक्याच्या क्षणी चौकार लगावत संघाला तीन सामन्यांच्या मालिकेत १-०ने आघाडी मिळवून दिली. भारताने नाणेफेक जिंकत न्यूझीलंडला फलंदाजीस बोलावले. न्यूझीलंडने २० षटकात १६४ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर लोकेश राहुल याने फार मोठी खेळी उभारली नाही. पण त्याच्या छोटेखानी खेळीच्या माध्यमातून त्याने एक पराक्रम केला.

हेही वाचा: IND vs NZ: रोहित-राहुल जोडीचा धमाका; केला धडाकेबाज विक्रम

१६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने वेगवान सुरुवात केली. ५ षटकात या दोघांनी फटकेबाजी करत संघाला अर्धशतक गाठून दिले. रोहितने धावसंख्येची तिशी ओलांडली होती. राहुलनेदेखील एक चौकार आणि एक षटकार खेचला. या फटकेबाजीच्या बळावर त्याने डावखुरा सलामीवीर शिखर धवन याला मागे टाकले. राहुलने १५ धावांची खेळी करत टी२० मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत शिखर धवनला मागे टाकलं. राहुलने ५५ सामन्यात १ हजार ७६६ धावा करत हा पराक्रम केला. या यादीत विराट कोहली अव्वल तर रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विजय; भारताच्या नावावर खास विक्रम

दरम्यान, पहिल्या टी२० सामन्यात न्यूझीलंडकडून वरच्या फळीतील दोन फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. अनुभवी मार्टीन गप्टीलने ४२ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकार खेचत ७० धावांची खेळी केली. नवख्या मार्क चॅपमॅनने त्याला झकास साथ दिली. त्याने ५० चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ६३ धावा केल्या. भारताच्या संघाला मात्र सामन्यात एकच अर्धशतकवीर मिळाला. कर्णधार रोहित शर्माला ४८ धावांवर बाद व्हावे लागले. त्याने ३६ चेंडूत ५ चौकार व २ षटकारांच्या साथीने धावा जमवल्या. पण त्यानंतर सूर्यकुमारने दमदार खेळ केला. त्याने ४० चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६२ धावा केल्या.

loading image
go to top