IND vs NZ: 2 चेंडूत 2 विकेट... तरीही रोहित शर्माने शार्दुलला केली शिवीगाळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ind vs nz rohit sharma angry with shardul thakur

IND vs NZ: 2 चेंडूत 2 विकेट... तरीही रोहित शर्माने शार्दुलला केली शिवीगाळ

India vs New Zealand : भारत आणि न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात शार्दुल ठाकूरला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. शार्दुलने बॅटने 25 धावा करण्यासोबतच गोलंदाजीत 3 गडी बादही केले. न्यूझीलंडची 25 षटकांनंतर धावसंख्या 2 बाद 184 अशी होती. डेव्हॉन कॉनवेसोबत डॅरेल मिशेल क्रीजवर होता. शार्दुलने 26व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मिशेलला बाद केले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर कर्णधार टॉम लॅथमलाही माघारी धाडले.

हेही वाचा: IND vs AUS Test: न्यूझीलंडला हरवल्यानंतर बुमराहबाबत कर्णधार रोहितचा मोठा खुलासा; म्हणाला...

पहिल्या दोन चेंडूत दोन विकेट घेतल्यानंतरही शार्दुल ठाकूरला कर्णधार रोहित शर्माने फटकारले. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर कर्णधार रोहित शर्माकडे गेला आणि त्याला रागाने शिवीगाळ केली. शार्दुलने ओव्हरचे शेवटचे दोन चेंडू टाकले. डेव्हॉन कॉनवेने शॉट बॉलवर सलग दोन चौकार मारले. याचा रोहित शर्माला राग आला. तो शार्दुलला फलंदाजांना शॉर्ट बॉल टाकू नका असे सांगत होता.

हेही वाचा: IND vs NZ: टी-20 मालिकेआधी कॅप्टन पांड्याला मोठा धक्का! हा दिग्गज खेळाडू बाहेर

शार्दुल ठाकूरने त्याच्या पुढच्या षटकातही एक विकेट घेतली. यावेळी त्याने विकेटच्या लाइनवर गोलंदाजी केली. त्यावर ग्लेन फिलिप्सने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश मिळाले नाही आणि चेंडू हवेत गेला. विराट कोहलीने त्याचा सहज झेल घेतला आणि भारतीय संघाला सहावे यश मिळाले.

हेही वाचा: Ranji Trophy: धोनीचा पठ्ठ्या परतलाय; वर्षानंतर केदार जाधवचे धडाकेबाज पुनरागमन

भारताच्या 386 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, डेव्हन कॉनवेच्या 138 धावा असूनही न्यूझीलंडचा डाव 41.2 षटकांत 295 धावांत आटोपला. भारताने वनडे मालिकेत तिसऱ्यांदा न्यूझीलंडचा क्लीन स्वीप केला आहे. भारताकडून शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादवने प्रत्येकी तीन बळी घेतले. भारताने यापूर्वी कर्णधार रोहितच्या 101 धावा आणि शुभमन गिलच्या 112 धावा केल्या होत्या. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 212 धावांच्या भागीदारीने नऊ विकेट्सवर 385 धावांची मजल मारली.