Prithvi Shaw : अखेर 379 धावा करणारा पृथ्वी शॉ 537 दिवसांनंतर टीम इंडियात परतला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prithvi Shaw Team India T20 Squad For IND vs NZ

Prithvi Shaw : अखेर 379 धावा करणारा पृथ्वी शॉ 537 दिवसांनंतर टीम इंडियात परतला

Prithvi Shaw Team India T20 Squad For IND vs NZ : रणजी ट्रॉफी सामन्यात 379 धावांची धमाकेदार खेळी करणाऱ्या पृथ्वी शॉने भारतीय संघाचा विचार करत नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र या खेळीच्या अवघ्या दोन दिवसात त्याला भारतीय संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे. पृथ्वी शॉ तब्बल 537 दिवसांनी भारतीय संघात परतला आहे. त्याची न्यूझीलंडविरूद्ध होणाऱ्या तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी संघात निवड झाली आहे.

हेही वाचा: Suryakumar Yadav : कसोटी संघात सूर्याची ग्रँड एन्ट्री तर जडेजासाठी BCCI ची खास नोट

रणजी ट्रॉफीत 379 धावांची धडाकेबाज खेळी केल्यानंतर पृथ्वी शॉला भारतीय संघात निवड होण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्यावेळी त्याने अत्यंत परिपक्वपणे उत्तर दिले होते.

पृथ्वी शॉ पीटीआयशी बोलताना म्हणाला होती की, 'आता मी कोणी तरी मला कॉल करून तुला भारतीय संघात स्थान दिल्याचे सांगले याबाबत विचार करत नाही. मी सध्या माझ्या परीने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय आणि करतही आहे. सध्या मी फार पुढचा विचार करत नाहीये.'

पृथ्वी शॉ पुढे म्हणाला की, 'मी असा व्यक्ती आहे जो आता एकावेळी एकच दिवस जगतोय. मी माझा दिवस कसा चांगला जाईल हे पाहतोय. मी मुंबईकडून खेळतोय त्यामुळे माझे सध्या ध्येय एकच आहे. मुंबईला रणजी ट्रॉफी जिंकून देणे.'

विशेष म्हणजे या प्रतिक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी पृथ्वी शॉची भारतीय टी 20 संघात निवड झाली. मात्र सध्याच्या टी 20 संघातील सलामीवीर पाहिले तर पृथ्वी शॉला न्यूझीलंड दौऱ्यावर प्लेईंग 11 मध्ये संधी मिळेल याची शाश्वती नाही. असे असले तरी त्याने आईस ब्रेक करत जवळपास 500 दिवसांनी टीम इंडियात पुनरागमन केले आहे. हे देखील नसे थोडके!

हेही वाचा: Rajashree Swain : ओडिसातील बेपत्ता झालेल्या महिला क्रिकेटपटूचा मृतदेह सापडला जंगलात

न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठीचा भारताचा टी 20 संघ :

हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार

(Sports Latest News)

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'