IND vs NZ, 2nd Test Day 3 : टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs NZ

IND vs NZ, 2nd Test Day 3 : टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर

India vs New Zealand, 2nd Test Day 3 At Wankhede Stadium, Mumbai : मुंबई कसोटी सामन्यातील दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ विजयापासून पाच पावले दूर आहे. तिसऱ्या दिवसाअखेर न्यूझीलंडने धावफलकावर 5 बाद 140 धावा केल्या असून रिचन रविंद्र 2 (23) आणि हेन्री निकोलस 36 (86) मैदानात खेळत होते. न्यूझीलंडकडून डॅरेल मिशेलने सर्वाधिक 60 धावा केल्या आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दुसरा डाव 7 बाद 276 धावांवर घोषीत केला. पहिल्या डावातील आघाडीसह टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 540 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. उर्वरित दिवसांत हे लक्ष्य पार करण न्यूझीलंडसाठी मोठी कसोटीच असेल. पहिल्या डावात विक्रमी 10 विकेट घेणाऱ्या एजाज पटेलनं दुसऱ्या डावात चार विकेट घेतल्या. दुसऱ्या बाजूला रविंद्र रचिनला तीन विकेट मिळाल्या.

न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. मयांक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि चेतेश्वर पजारा (Cheteshwar Pujara) या जोडीनं बिन बाद 69 धावांवर तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी केली. मयांक अग्रवालच्या रुपात एजाज पटेलनं टीम इंडियाला पहिला धक्का दिला. त्याने 108 चेंडूत 62 धावांची खेळी केली. चेतेश्वर पुजारा 97 चेंडूत 47 धावा करुन माघारी फिरला. त्याचे अर्धशतक अवघ्या तीन धावांनी हुकले. शुबमन गिल (Shubman Gill) आणि विराट कोहली (Shubman Gill) दोघे संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

129-5 : आधीच अडचण त्यात न्यूझीलंडने रन आउटच्या रुपात गमावली आणखी एक विकेट, टॉम ब्लंडेल खातेही न उघडता परतला तंबूत

128-4 : डॅरेन मिशेलचा संयम सुटला, अक्षर पटेलनं 60 धावांवर धाडले तंबूत

55-3 : अश्विनच्या खात्यात तिसरी विकेट, रॉस टेलरचा 6 पुजाराने घेतला झेल

45-2 अश्विनने विल यंगच्या रुपात न्यूझीलंडला दिला आणखी एक धक्का, त्याने 20 धावांचे योगदान दिले

13-1 : न्यूझीलंडला पहिला धक्का, टॉम लॅथम अश्विनच्या जाळ्यात फसला, त्याने 6 धावा केल्या

जयंत यादव आउट होतात विराटने दुसरा भारताचा डाव 7 बाद 276 धावांवर घोषीत केला

276-7 : जयंत यादवच्या रुपात एजाजच्या खात्यात आणखी एक यश, एजाज पटेलनं त्याला 6 धावांवर धाडले माघारी

238-6 : वृद्धिमान साहा 12 चेंडूत 13 धावा करुन तंबूत परतला, रचिन रविंद्रला यश

217-5 : विराट कोहली 36 धावा करुन माघारी, रचिन रविंद्रनं केलं बोल्ड

211-4 : एजाजच्या खात्यात आणखी एक यश, श्रेयस अय्यर 8 चेंडूत 14 धावा करुन माघारी

197-3 : शुबमन गिलचे अर्धशतक हुकले, 47 धावांवर रचिन रविंद्रन लॅथमकरवी केलं झेलबाद

कोहली-शुबमन गिल जोडीची अर्धशतकी भागीदारी

पुजारा तंबूत परतल्यानंतर कर्णधार विराट कोहली मैदानात उतरला आहे. तर शुभमन गिल ७ धावांवर खेळत आहे.

मयंक अग्रवालनंतर एजाजने चेतेश्वर पुजारालासुद्धा बाद केलं. पुजारा ४७ धावांवर खेळत असताना स्लीपमध्ये झेल देऊन बाद झाला. भारताची धावसंख्या २ बाद ११५ अशी झाली आहे.

मयंक अग्रवाल एजाज पटेलच्या गोलंदाजीवर विल यंगकडे झेल देऊन बाद झाला. त्यानं १०८ चेंडूत ६२ धावा केल्या.

दुसऱ्या डावात भारताच्या १०० धावा पूर्ण झाल्या असून चेतेश्वर पुजारा ४१ धावांवर तर मयंक अग्रवालच्या ५७ धावा झाल्या आहेत.

मयंक अग्रवालने एजाज पटेलच्या गोलंदाजीवर षटकार खेचत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर चौकार मारला. मयंक अग्रवालने ९० चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या. भारताकडे ३६२ धावांची आघाडी आहे.

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा चेतेश्वर पुजारा आणि मयंक अग्रवाल खेळत होते. भारताची धावसंख्या बिनबाद ६९ होती.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईत सुरु असलेल्या कसोटीत भारताने दुसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात बिनबाद ६९ धावा केल्या होत्या. यासह भारताने कसोटीत 332 धावांची आघाडी मिळवली होती. भारताने पहिल्या डावात ३२५ धावा केल्या. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडचा पहिला डाव ६२ धावांत गुंडाळला.

Web Title: Ind Vs Nz Test 3rd Day Live Update Cricket Score Mayank Agraval India Virat Kohli

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Indianew zealandind vs nz