Captaincy Record : रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया नेहमीच 'अजिंक्य' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ajinkya rahane
रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया नेहमीच 'अजिंक्य'

रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया नेहमीच 'अजिंक्य'

sakal_logo
By
सुशांत जाधव

IND vs NZ: टीम इंडियाने घरच्या मैदानात रंगलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत न्यूझीलंडला क्लीन स्विप केले. आता दोन्ही संघ कसोटी सामन्यासाठी सज्ज झाले आहे. टी-20 मुंबईकर रोहित शर्माच्या धमाक्यानंतर कानपूरच्या मैदानात दुसरा मुंबईकर टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेच्या खांत्यावर टीम इंडियाची मदार असेल. कसोटी स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजारा पहिल्या कसोटी सामन्यात उप-कर्णधाराच्या भूमिकेत दिसेल.

अजिंक्य रहाणेचा कॅप्टन्सीचा रेकॉर्ड हा कमालीचा आहे. जे अन्य कोणत्याही कर्णधाराला जमलेलं नाही ते अजिंक्यनं करुन दाखवलंय. कोहलीच्या अनुपस्थितीत रहाणेनं आतापर्यंत 5 कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. यात भारतीय संघाने एकही मॅच गमावलेली नाही. यात टीम इंडियात चार सामने जिंकले असून एक सामना अनिर्णित राहिला आहे.

हेही वाचा: WBBL हरमनप्रीतने रचला इतिहास, असा पराक्रम करणारी पहिली भारतीय

रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया नेहमीच 'अजिंक्य'

अजिंक्य रहाणे टीम इंडियाचा असा एकमेव कर्णधार आहे ज्याने पाच पेक्षा अधिक सामन्यात नेतृत्व करताना एकही कसोटी सामना गमावलेला नाही. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी आणखी उत्तम करण्यासाठी तो प्रयत्नशील असेल. रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात अशक्यप्राय विजय नोंदवून इतिहास घडवला होता. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला ब्रिस्बेनच्या मैदानात हरवून दाखवले होते.

रहाणेपूर्वी या दिग्गजानेही करुन दाखवलाय पराक्रम

अजिंक्य रहाणेपूर्वी कृष्णमाचारी श्रीकांत यांनी अशीच कमाल करुन दाखवली होती. पण त्यांनी केवळ चार सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व केले होते. यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला असता तरी एकही सामना टीम इंडियाने जिंकला नव्हता. श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने हे चारही सामने अनिर्णित राखले होते.

हेही वाचा: IPL 2022 auction : RCB या 4 खेळाडूंना रिटेन करेल, चोप्रांचा अंदाज

कसोटीत कोहली सर्वात यशस्वी कर्णधार

विराट कोहली हा भारतीय कसोटी संघाचा यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आतापर्यंत 65 कसोटी सामने खेळले आहेत. यात 38 सामन्यात विजय तर 16 सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. 11 सामने अनिर्णित राहिले आहेत. कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रमही कोहलीच्या नावे आहे. त्याच्यापाठोपाठ या यादीत महेंद्रसिंह धोनीचा नंबर लागतो. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 60 सामन्यात 27 विजय आणि 18 पराभव स्विकारले आहेत. तर 15 सामने अनिर्णित राहिले आहेत.

loading image
go to top