माझ्या पत्नीच्या बड्डेला बोल्टकडून परफेक्ट गिफ्ट - सूर्यकुमार यादव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माझ्या पत्नीच्या बड्डेला बोल्टकडून परफेक्ट गिफ्ट - सूर्यकुमार

सामनावीरचा पुरस्कार पटकावणारा सूर्यकुमार यादव १७ व्या षटकात ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर बाद झाला होता.

माझ्या पत्नीच्या बड्डेला बोल्टकडून परफेक्ट गिफ्ट - सूर्यकुमार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

टी २० वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत चांगली सुरुवात केली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी २० सामन्यात पाच गडी राखून भारताने विजय मिळवला. भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड आणि कर्णधार म्हणून रोहित शर्मा यांनी जबाबदारी घेतल्यानतंर विजयी सुरुवात केली आहे. जयपूरमध्ये झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात भारताने ५ गडी राखून न्यूझीलंडचा पराभव केला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी मिळवली आहे. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना गुप्टील आणिच चॅपमॅन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ६ बाद १६४ धावा केल्या. गुप्टिलने ४२ चेंडूत ७० तर चॅपमॅनने ५० चेंडूत ६३ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने ५ गड्यांच्या मोबदल्यात दोन चेंडू बाकी असतानाच विजय मिळवला. भारताच्या विजयात सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा यांनी मोलाची कामगिरी बजावली. सूर्यकुमार यादवने ६२ आणि रोहित शर्माने ४८ धावांची खेळी केली. सूर्यकुमारने ४० चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकार खेचले. त्याने रोहित शर्मासोबत ५९ धावांची भागिदारी केली. सूर्यकुमारला सामनावीर पुरस्कारही देण्यात आला.

सामन्यानंतर बोलताना सूर्यकुमारने म्हटलं की, मी काही वेगळं करत नाही, मी नेट्संमध्ये अशीच फलंदाजी करतो आणि पुन्हा तसंच करण्याचा प्रयत्न करतो. नेटमध्ये स्वत:वर प्रेशर टाकतो. मी आऊट झालो तर ड्रेसिंगरुमला जातो. विचार करतो की यापेक्षा आणखी चांगलं काय करू शकलो असतो. चेंडू बॅटवर येत होते आणि आम्ही मॅच जिंकलो याचा आनंद आहे.

हेही वाचा: IND vs NZ: राहुलने एक चौकार अन् एक षटकार लगावत रचला पराक्रम

मला सामना पूर्ण खेळायचा होता पण तुम्ही असेच शिकता आणि पुढे जाता. ट्रेंट बोल्टबद्दल सांगायचं तर आज माझ्या पत्नीचा वाढदिवस आहे, बोल्टने माझा जो झेल सोडला ते माझ्या पत्नीसाठी परफेक्ट बर्थडे गिफ्ट होतं असं सूर्यकुमारने म्हटलं आहे. सामनावीरचा पुरस्कार पटकावणारा सूर्यकुमार यादव १७ व्या षटकात ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर बाद झाला होता. मात्र त्याआधी १६ व्या षटकात टीम साउदीच्या गोलंदाजीवर सूर्यकुमारला जीवदान मिळाले होते. क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या ट्रेंट बोल्टने सूर्यकुमारचा सोपा झेल सोडला होता.

loading image
go to top