IND vs PAK : भारत-पाक सामन्याने मोडले सगळे विक्रम, 'इतक्या' लोकांनी पाहिली मॅच

IND vs PAK Asia Cup 2022
IND vs PAK Asia Cup 2022 sakal
Updated on

IND vs PAK Viewers : आशिया चषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याने डिजिटल प्लॅटफॉर्मवरील दर्शकांचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. रविवारी दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये झालेली हा हाय व्होल्टेज सामना डिजिटल प्लॅटफॉर्मवर कोट्यवधी लोकांनी पाहिला.

भारतात, Disney + Hotstar वर 13 मिलियन लोकांनी सामना पाहिला, तर पाकिस्तानमध्ये त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग Daraz अॅपवर पाहिले गेले. InsideSports च्या रिपोर्टनुसार हा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आतापर्यंतचा सर्वाधिक पाहिला जाणारा सामना बनला आहे. दोन्ही संघांमधील या सामन्याने Disney + Hotstar वरील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक दर्शक मिळाल्याचा विक्रम मोडला आहे.

रिपोर्टनुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील IPL 2019 च्या सामन्यादरम्यान, ओव्हर टॉप (OTT) प्लॅटफॉर्मने 12 मिलीयनची रेकॉर्ड व्ह्यूवरशीप गाठली होती. पण हे रेकॉर्ड सुद्धा त्याच मोसमातील अंतिम सामन्यात 18 मिलियन दर्शक संख्येने मोडला. आशिया चषक 2022 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान लाइव्ह स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर 10 मिलियनहून अधिक सक्रिय दर्शक होते. पाकिस्तानमध्येही हा सामना 13 मिलीयनहून अधिक प्रेक्षकांनी ड्राझ क्रिकेट अॅपवर पाहिला.

IND vs PAK Asia Cup 2022
Upcoming Smartphones : सप्टेंबरमध्ये लॉन्च होतील 'हे' स्मार्टफोन्स, पाहा यादी

विशेष म्हणजे, दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये 25,000 प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे आणि संपूर्ण स्टेडियम सामन्याच्या संपूर्ण वेळेसाठी प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. यासामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव करून स्पर्धेतील आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. तर भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा हा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 100 वा सामना होता.

IND vs PAK Asia Cup 2022
Jio AIRFIBER : काय आहे हे अनोखे डिव्हाइस, कसे काम करेल? जाणून घ्या सर्व काही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com