Upcoming Smartphones : सप्टेंबरमध्ये लॉन्च होतील 'हे' स्मार्टफोन्स, पाहा यादी

Upcoming Smartphones in September
Upcoming Smartphones in September

Upcoming Smartphones in September : ऑगस्ट महिना आता संपत आला आहे, या महिन्यात अनेक स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले. पण आता येत्या सप्टेंबरमध्ये असे स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत, ज्याची लोक खूप दिवसांपासून वाट पाहत होते. बाजारात दर महिन्याला अनेक स्मार्टफोन लॉन्च केले जातात आणि सप्टेंबर महिन्यातही अनेक स्मार्टफोन लॉन्च केले जातील. पण आज आपण अशा स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्यावर सगळ्यांच्या नजरा खिळल्या असतील.

  • Apple iphone 14- संपूर्ण जग Apple iphone 14 ची आतुरतेने वाट पाहत आहे. Apple 7 सप्टेंबरला iPhone 14 सीरीज लॉन्च करणार आहे. या सीरिजमधून iphone 14, iphone 14 max, iphone 14 pro आणि iphone 14 pro max या नावाने 4 स्मार्टफोन लॉन्च केले जाऊ शकतात.

  • Samsung Galaxy A23 5G- लोक सॅमसंगच्या या मिड-रेंज स्मार्टफोनची देखील वाट पाहत आहेत. कारण Galaxy A23 ची 4G आवृत्ती सध्या बाजारात उपलब्ध आहे. पण 5G च्या जमान्यात लोक मध्यम श्रेणीतील 4G फोन घेण्याचा विचार करत नाहीत. Samsung ने बाहेरच्या काही देशांमध्ये तो लॉन्च केला आहे. पण तो आता भारतात लॉन्च होणार आहे.

  • Moto X30 Pro- मोटोरोला 8 सप्टेंबर रोजी भारतात त्याच्या एज सीरिजमधून 3 नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनीने अद्याप एज सीरीजमधून कोणते फोन लॉन्च केले जातील हे सांगितलेले नाही, परंतु मोटोरोला Moto X30 Pro लाँच करू शकते अशी अपेक्षा आहे.

Upcoming Smartphones in September
उद्या लॉंच होतेय MG Motors ची नवीन कार, जाणून घ्या डिटेल्स
  • iQOO Neo 7- चीनी कंपनी iQOO आपला नवीन स्मार्टफोन iQOO Neo 7 देखील लॉन्च करणार आहे. मात्र, कंपनीने याबाबत अद्याप कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही.

  • Vivo X Fold S- Vivo आपला फोल्डेबल स्मार्टफोन Vivo X Fold S सप्टेंबरमध्ये लॉन्च करेल. हा फोन देखील तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

  • Xiaomi 12 Series- Xiaomi आपली Xiaomi 12 सीरीज सप्टेंबरमध्ये लॉन्च करेल. या सीरीजमध्ये, कंपनी आपले 3 स्मार्टफोन Xiaomi 12 S Ultra, Xiaomi 12 S Pro आणि Xiaomi 12 S सादर करू शकते.

  • Moto Razr 2022- Motorola सप्टेंबरमध्येच Moto Razr 2022 देखील लाँच करू शकते.

  • Jio Phone 5G- रिलायन्स सप्टेंबर महिन्यात सर्वात स्वस्त 5G फोन Jio Phone 5G म्हणून लॉन्च करेल. अनेकांचे लक्ष या फोनकडे असणार आहे.

Upcoming Smartphones in September
Jio चे दमदार रीचार्ज प्लॅन, फ्री ओटीटी सबस्क्रिप्शन मिळेल 150GB डेटा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com