Ind vs Pak : पाकिस्तानला टाईमपास नडला; ICC च्या नियमाचा भारताला फायदा

आयसीसीच्या नव्या नियमामुळे क्रिकेटच्या मैदानात आता विनाकारण वेळ घालवणे महागात पडणार आहे.
Ind vs Pak
Ind vs Pak

IND vs PAK Asia Cup 2022 : आयसीसीच्या नव्या नियमामुळे क्रिकेटच्या मैदानात आता विनाकारण वेळ घालवणे महागात पडणार आहे. याचा प्रत्यय भारत-पाकिस्तान यांच्यामधील आशियाई करंडकातील लढतीदरम्यान आला. निर्धारित वेळेत षटक पूर्ण न करता आल्यास उर्वरित षटकांसाठी 30 यार्डच्या वर्तुळामध्ये चारऐवजी पाच क्षेत्ररक्षक ठेवावे लागतात. त्यामुळे फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होऊ शकतो. पाकिस्तान व भारत या दोन्ही डावांच्या अखेरच्या षटकांमध्ये दोन्ही संघांना पाच क्षेत्ररक्षक वर्तुळामध्ये ठेवावे लागले होते. मात्र पाकिस्तानपेक्षा भारताला याचा फायदा अधिक झाला आणि अटीतटीच्या लढतीत टीम इंडियाचा संघ विजयी ठरला.

Ind vs Pak
IND vs PAK : आफ्रिदीची LIVE शोमध्ये गंभीरवर चिखलफेक; भज्जीच्या प्रतिक्रियेने चाहते संतापले

क्रिकेटच्या खेळात आता नियम महत्त्वाचे ठरणार आहेत. षटकांच्या गतीवरून आयसीसी आक्रमक झाली आहे. यामुळे खेळाडूंना शिस्तही लागणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या लढतीचे टायमिंग वाढणार नाही. सातत्याने चुका करणाऱ्या संघाला शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे भविष्यात क्रिकेट हा खरोखरच जंटलमन खेळ म्हणून ओळखला जाईल.

काय आहे नियम
जानेवारी, 2022 मध्ये आयसीसीकडून नव्या नियमाचा अवलंब करण्यात आला. या नियमानुसार डावाच्या 85 व्या मिनिटाला 20 वे षटक सुरू व्हायला हवे. असे झाले नाही तर त्या डावातील उर्वरित षटकांमध्ये चारऐवजी पाच क्षेत्ररक्षण 30 यार्ड वर्तुळामध्ये ठेवावे लागतात. या वेळी तिसऱ्या पंचांचे वेळेवर लक्ष असते.

Ind vs Pak
IND vs PAK : भारत-पाक सामन्याने मोडले सगळे विक्रम, 'इतक्या' लोकांनी पाहिली मॅच

काय घडले

- पाकिस्तानचा संघ फलंदाजी करीत असताना : भारतीय गोलंदाज वेळेत षटके टाकण्यात अपयशी ठरले. त्यामुळे अखेरच्या दोन षटकांमध्ये भारताला पाच क्षेत्ररक्षक वर्तुळामध्ये ठेवावे लागले. पाकिस्तानची अवस्था 18 व्या षटकांनंतर 7 बाद 124 धावा अशी झाली होती. पाकिस्तानने अखेरच्या दोन षटकांत 23 धावा फटकावल्या. पाकिस्तानने 18 व्या षटकांपर्यंत जास्त विकेट गमावले होते. त्यामुळे भारताचे अखेरच्या दोन षटकांमध्ये जास्त नुकसान झाले नाही.

- भारतीय संघ फलंदाजी करीत असताना : पाकिस्तानी गोलंदाजांकडून नियम व शिस्त पाळली गेली नाही. त्यामुळे 18, 19 व 20 या तिन्ही षटकांदरम्यान त्यांना पाच क्षेत्ररक्षक वर्तुळामध्ये ठेवावे लागले. भारताने 17 व्या षटकानंतर 4 बाद 116 धावा केल्या होत्या. अखेरच्या तीन षटकांमध्ये भारताला विजयासाठी 32धावांची आवश्‍यकता होती. रवींद्र जडेजाने नसीम शहा टाकत असलेल्या 18 व्या षटकांत 1 चौकार व 1 षटकार मारला. त्यानंतर हार्दिक पंड्याने हारीस रौफ टाकत असलेल्या 19 व्या षटकांत 3 चौकार खेचले. अखेर 20 व्या षटकात मोहम्मद नवाजच्या गोलंदाजीवर षटकार मारून हार्दिकने भारताला विजय मिळवून दिला. त्यामुळे पाकिस्तानला टाईमपास करणे चांगलेच महागात पडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com