IND vs PAK Streaming : भारत-पाक सामना 'फ्री' पाहता येणार, नाही गरज कोणत्याही सब्सक्रिप्शनची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ind vs pak T20 World Cup 2022 Live Streaming Free

IND vs PAK Streaming : भारत-पाक सामना 'फ्री' पाहता येणार, नाही गरज कोणत्याही सब्सक्रिप्शनची

India vs Pakistan Streaming : टी-20 विश्वचषक मध्ये रविवारी भारताला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सामना करायचा आहे. या दोघांमधील हा सामना मेलबर्नमध्ये खेळल्या जाणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांना विजयाने मोहिमेची सुरुवात करायची आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ चाहत्यांना दिवाळीची भेट देण्यासाठी मैदानात उतरेल. हे दोन्ही संघ वर्षभरानंतर टी-20 विश्वचषकात आमने-सामने येणार आहेत.

हेही वाचा: IND vs PAK T20 Live: दिवाळीआधी मेलबर्नमध्ये होणार धमाका, टीम इंडिया घेणार पाकिस्तानचा बदला

दुबईत गेल्या वेळी शाहीन आफ्रिदीची धोकादायक गोलंदाजी आणि बाबर आझम-मोहम्मद रिझवान यांच्या स्फोटक खेळीमुळे पाकिस्तानने टीम इंडियाचा 10 विकेट्सने पराभव केला होता. विश्वचषकात भारताला पहिल्यांदाच पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरेल.

हेही वाचा: IND vs PAK Melbourne Weather : ऑस्ट्रेलियाचे वेदर काय म्हणत; भारत-पाक भिडणार की स्वतःच थैमान घालणार

जाणून घेऊया मॅचच्या प्रक्षेपण संबंधित सर्व माहिती...

  • भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कधी, कुठे आणि किती वाजता सुरू होणार?

    भारत आणि पाकिस्तान यांच्यात 23 ऑक्टोबरला  भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 1.30 वाजता खेळल्या जाणार आहे.

  • सामना कोणत्या टीव्ही चॅनेलवर प्रसारित केला जाईल?

    आशिया कपच्या प्रसारणाचे अधिकार स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. तुम्ही हा सामना स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 3, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट एचडी वर पाहू शकता.

  • भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 'फ्री' कुठे पाहायचा

    हा सामना डीडी स्पोर्ट्स चॅनलवर डीडी फ्री डिशवर प्रसारित केला जात आहे. डीडी स्पोर्ट्स चॅनलसाठी कोणतेही शुल्क नाही. अशा परिस्थितीत तुम्ही कोणतेही पैसे न भरता हा सामना पाहू शकता.