Virat Kohli : सर्वोत्तम इनिंग! पांड्याने दिला खास सल्ला, कोहलीची कारकिर्दितील 'विराट' खेळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli-Hardik Pandya

Virat Kohli : सर्वोत्तम इनिंग! पांड्याने दिला खास सल्ला, कोहलीची कारकिर्दितील 'विराट' खेळी

Virat Kohli-Hardik Pandya Ind vs Pak T20WC : टी-20 विश्वचषक 2022 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना एक रोमांचक असा झाला. सामन्याचा थरार एवढा होता की प्रत्येक षटकात सामना एका बाजूने जात होता. पण यादरम्यान टीम इंडियाचा चेस मास्टरने पाकिस्तानच्या प्रत्येक भक्कम पैलूंवर मात करत टीम इंडियाच्या विजयाचा उंबरठा ओलांडला. जिथे एकेकाळी भारताचा पराभव निश्चित वाटत होता, तिथे विराटने हार्दिक पांड्यासोबत विजयाचे काहणी लिहिले.

हेही वाचा: Rohit Sharma : 'इथं' फिरला सामना! पाकवरील थरारक विजयानंतर रोहितची प्रतिक्रिया

भारताचा माजी कर्णधार सामना संपल्यानंतर म्हणाला, मी जास्त बोलू शकत नाही कारण इथे खूप आवाज आहे. येथे एक अद्भुत वातावरण आहे. खेळादरम्यान हार्दिक पांड्या म्हणाला की, विश्वास ठेव, आपण शेवटपर्यंत हे साध्य करू. माझ्याकडे कदाचित शब्द नाहीत. नवाजकडे एक ओव्हर बाकी होती. इथे उभे राहणे हा बहुधा खूप खास क्षण आहे.

हेही वाचा: Virat Kohli : पाकविरूद्ध विजयी भार पेलणाऱ्या विराटला हिटमॅनने घेतले खांद्यावर, पहा Video

पुढे बोलताना विराट म्हणाला, माझ्याकडे शब्द नाहीत. आजपर्यंत मी म्हणत होतो की मोहाली मधील माझी टी-20 मधील सर्वोत्तम खेळी होती. तेव्हा मी 80 धावा केल्या होत्या, आज 80 धावा केल्या आहेत. दोघेही तितकेच खास आहेत. पण आजची खेळी ही माझी आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी राहिल. इतके महिने जेव्हा मी संघर्ष करत होतो, तेव्हा तुम्ही (चाहत्या) मला खूप साथ दिली. खूप खूप धन्यवाद.

हेही वाचा: Virat Kohli : सामना जिंकून देणाऱ्या विराटबद्दल क्रिकेटचा देव म्हणतो, शंकाच नाही की...

भारताने या विजयासह 2021 च्या शेवटच्या टी-20 विश्वचषकातील पाकिस्तानकडून 10 विकेट्सने पराभवाचा बदलाही घेतला आहे. अखेरच्या षटकात भारताला 16 धावा करायच्या होत्या आणि बाबर आझमने चेंडू मोहम्मद नवाजकडे सोपवला. भारताने शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक पद्धतीने विजय मिळवला. विराटने 53 चेंडूत सहा चौकार आणि चार षटकार मारले. त्याने हार्दिकसोबत पाचव्या विकेटसाठी 73 चेंडूत 113 धावांची शानदार शतकी भागीदारी केली.