World Cup 2023 : नृत्य आणि गाण्याची मैफल स्टेडियममध्ये रंगणार

भारत-पाक लढत असल्यामुळे सकाळी ११ वाजल्यापासून स्टेडियमच्या गेटवर गर्दी
ind vs pak world cup 2023 narendra modi stadium dance and song shankar mahadevan marathi news
ind vs pak world cup 2023 narendra modi stadium dance and song shankar mahadevan marathi newsSakal

अहमदाबाद : विश्वकरंडक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्याअगोदर नियोजित होत असलेला उद्‌घाटनाचा सामना ऐनवेळी रद्द करण्यात आला होता; मात्र यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर उद्या भारत-पाक सामन्याच्या निमित्ताने करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे; मात्र त्यासाठी प्रेक्षकांना दुपारीच मैदानात यावे लागेल आणि उन्हाचे चटके सहन करत हा कार्यक्रम पाहावा लागणार आहे.

ind vs pak world cup 2023 narendra modi stadium dance and song shankar mahadevan marathi news
Ind vs Pak : शुभमन गिल पाकिस्तानविरुद्ध खेळणार? रोहित शर्माने 'ही' दिली अपडेट

अर्जित सिंग, सुखविंदर सिंग, सुनिधी चौहान, नेहा कक्कर आदी कलाकार आपली अदाकारी सादर करतील. त्याला शंकर महादेवन यांच्या सुरेल गीताची जोड असेल. शुक्रवारी या कार्यक्रमाची रंगीत तालीम पार पडली.

ind vs pak world cup 2023 narendra modi stadium dance and song shankar mahadevan marathi news
IND vs PAK World Cup 2023 : भारत - पाक वर्ल्डकप सामन्यात सर्वाधिक विकेट्स आहेत कोणाच्या नावावर?

सामना दुपारी दोन वाजता सुरू होतो; पण ही भारत-पाक लढत असल्यामुळे सकाळी ११ वाजल्यापासून स्टेडियमच्या गेटवर गर्दी होणार आणि त्याअगोदर पासून स्टेडियमकडे येणारे सर्व रस्ते गर्दीने फुलून जाणार आहेत. मात्र सकाळीच घराबाहेर पडणाऱ्या प्रेक्षकांना रात्री उशिरापर्यंत स्टेडियममध्ये राहण्याचे परिश्रम करावे लागतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com