
Ind Vs Sa: आफ्रिके विरुद्ध आपले रेकॉर्ड पाहून कप्तान ऋषभ पंतला फुटला घाम
IND vs SA Head To Head: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 सामन्यांची T20 मालिका आजपासून सुरू होत आहे. आयपीएल नंतर भारताची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका आहे. मालिकेसाठी रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर दुखापतींमुळे केएल राहुल आणि कुलदीप यादव खेळू शकणार नाही. अशा परिस्थितीत ऋषभ पंत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याचबरोबर नुकतेच गुजरात टायटन्सला आयपीएल चॅम्पियन बनवणाऱ्या हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.(rishabh pant captain debut india vs south africa cricket)
हेही वाचा: Ind Vs Sa: डिअर BCCI...संजू सॅमसनसाठी फॅन्सने केली ही मागणी
भारताचे दक्षिण आफ्रिकाविरुद्ध घरच्या मैदानावरचे रेकॉर्ड खूपच निराशाजनक आहे. हे आकडे पाहून ऋषभ पंतला नक्कीच घाम फुटेला असला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये एकूण 15 T-20 सामने खेळले गेले आहे. भारतने ज्यात 9 आणि आफ्रिकाने 6 सामने जिंकले आहेत. पण भारतात संघ 2015 पासून ते आतापर्यंत घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4 सामने खेळला आहे. ज्यामध्ये भारताचा तीन वेळा पराभूत झाला आहे. घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध भारताच्या विजयाची टक्केवारी 25 आहे. बाकीच्या तुलनेत सर्वात कमी आहे.
हेही वाचा: धोनी अन् मिताली राज यांच्या करिअरमधील पाच साम्य
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली, ना जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा हे खेळाडू भारतीय प्लेइंग इलेव्हनचा अविभाज्य भाग आहेत. या वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतसाठी प्लेइंग इलेव्हनची निवड करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. आता पंत कोणत्या खेळाडूंना पहिल्या T20 मध्ये संधी देतो हे पाहावे लागेल.
भारत : ऋषभ पंत (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अवेश खान, अर्शदीप सिंह आणि उमरान मलिक.
Web Title: Ind Vs Sa 1st T20i Head To Head Record Rishabh Pant Captain Debut India Vs South Africa Cricket
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..