India Lose Toss Again
esakal
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरु झाली आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हा सामना गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जातो आहे. शुभमन गिलच्या अनुपस्थितीत रिषभ पंतकडे भारतीय संघाचं नेतृत्व देण्यात आलं आहे. हा सामना जिंकत कसोटी मालिका बरोबरीत सोडवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे.