Gautam Gambhir Under Fire
esakal
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना गुवाहाटी येथे सुरू आहे. पहिल्या सामन्यात भारताला पराभव स्वीकाराला लागला होता . मात्र, आता दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघ पराभवाच्या छायेत आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात गोलंदाजांसह फलंदाजांनीही निराशा केली आहे. महत्त्वाचे म्हणजे सलग होणाऱ्या भारताच्या या पराभवानंतर प्रशिक्षक गौतम गंभीरच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अनेकांकडून त्याच्यावर टीका केली जाते आहे. भारतीय संघाची अशी अवस्था बघता अनेकांनी गौतम गंभीरची तुलना ग्रेग चॅपल यांच्याशी केली आहे.