बुमराहनं 'मार' सहन केला एकाचा; राग निघाला दुसऱ्यावर

SA vs Ind
SA vs IndSakal
Summary

विराट कोहलीसह संघातील इतर सहकाऱ्यांनी उभे राहून बुमराहच्या फटकेबाजीला दाद दिली.

South Africa vs India, 2nd Test : जोहन्सबर्गच्या वांडरर्स मैदानात भारत दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना रंगला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीये. यजमान दक्षिण आफ्रिका संघाला दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्यासाठी 240 धावा करायच्या आहेत. दुसरीकडे भारतीय संघाला ऐतिहासिक विजयासाठी 8 विकेट्स घ्यायच्या आहेत. दोन दिवसांतील एका दिवसातच या सामन्याचा निकाल लागणं अपेक्षित आहे. (ind vs sa jasprit bumrah hits kagiso rabada for six got a standing ovation indian dressing room watch)

या मालिकेत काय होणार याची जशी जोरदार चर्चा सुरु आहे. अगदी तसाच माहोल जसप्रित बुमराहच्या एका कडक स्ट्रोकच्या बाबतीतही सोशल मीडियावर दिसून येतो. या सामन्यादरम्यान आधी डेन एल्गर आणि केएल राहुल (KL Rahul) यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. तिसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मार्को जेनसन यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला.

SA vs Ind
अँडरसन! सचिन तेंडुलकरनंतर खास पराक्रम करणारा एकमेव 'हिरा'

जसप्रीत बुमराहनं मार्को जेनसनचा राग कगिसो रबाडावर काढल्याचे पाहायला मिळाले. मार्को जेनसन सातत्याने बॉडी लाईन गोलंदाजी करत हतोा. भारताच्या दुसऱ्या डावातील 54 व्या षटकात जेनसन याने बुमराहला शॉर्ट बॉल टाकला. खांद्यावर चेंडू लागल्यावर बुमराहने प्रतिस्पर्धी गोलंदाजाला खुन्नस दाखवली. जेनसनच्या गोलंदाजीचा राग बुमराहने रबाडावर काढला.

SA vs Ind
हीच ती वेळ! पुजाराला संधी द्या, पण अजिंक्यला बाहेर बसवा : गंभीर

कगिसो रबाडाने (Kagiso Rabada) बुमराहला पहिले दोन चेंडू नो बॉल टाकले. त्यानंतरच्या चेंडूवर बुमराहनं डीप स्केअर लेगच्या दिशेन सिक्सर लगावला. बुमराहचा हा शॉट पाहून भारतीय ड्रेसिंग रुममध्ये वातावरण फुलल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहलीसह संघातील इतर सहकाऱ्यांनी उभे राहून बुमराहच्या फटकेबाजीला दाद दिली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com