IND vs SL: तुफानी शतक झळकावूनही सूर्या होणार टीम इंडियातून बाहेर? हा खेळाडू घेणार जागा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs SL ODI Series Suryakumar Yadav

IND vs SL: तुफानी शतक झळकावूनही सूर्या होणार टीम इंडियातून बाहेर? हा खेळाडू घेणार जागा

IND vs SL ODI Series Suryakumar Yadav : भारतीय क्रिकेट संघाने 2023 ची पहिली मालिका जिंकली आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याने 2-1 ने विजय मिळवला. शनिवारी राजकोटच्या SCA स्टेडियमवर भारताने मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना 91 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया एकदिवसीय मालिका खेळणार आहे, जी 10 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

हेही वाचा: Suryakumar Yadav: वयाच्या 30व्या वर्षी संधी मिळाली त्यामुळे धावांचा भुकेला

सलामीवीर रोहित शर्मासह काही वरिष्ठ खेळाडूंना श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. आता सर्व एकदिवसीय मालिकेसाठी संघात परततील. भारतीय संघ आता गुवाहाटीला पोहोचला आहे जिथे तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळल्या जाणार आहे.

केएल राहुल, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि श्रेयस अय्यर हे वनडे मालिकेसाठी संघात आहेत. टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात झंझावाती शतक झळकावणारा सूर्यकुमार यादव देखील एकदिवसीय संघाचा भाग आहे, परंतु त्याच्या स्थानासाठी आणखी एक खेळाडू उत्सुक आहे.

हेही वाचा: Hind Kesari Kitab : 'हिंद केसरी'ची गदा यंदा महाराष्ट्राकडे! पुण्याच्या अभिजीतने मारलं मैदान

सूर्यकुमार यादवने टी-20 मालिकेत अप्रतिम कामगिरी केली. मुंबईच्या या फलंदाजाने राजकोट टी-20 मध्ये 112 धावांची इनिंग खेळली होती. तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरतो. वनडेमध्ये या क्रमांकावर त्याच्यासमोर आणखी एक स्पर्धक आहे तो म्हणजे श्रेयस अय्यर.

श्रेयसने बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत भाग घेत अप्रतिम फलंदाजी दाखवली. आता संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांना गुवाहाटी वनडेसाठी प्लेइंग-11 निवडताना थोडी मानसिक कसरत करावी लागणार आहे.

हेही वाचा: WTC Final: गेम ऑन! भारत सलग दुसऱ्यांदा खेळणार फायनल, शर्यतीत एकूण सहा संघ

श्रेयस अय्यरला हलकेही घेता येणार नाही. त्याच्या कामगिरीत सातत्य आहे. याआधी तो बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळला होता आणि दोन्ही सामन्यात त्याने अर्धशतके झळकावली होती. पहिल्या कसोटी सामन्यात त्याने 86 आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात 87 आणि 29 धावा केल्या. बांगलादेशविरुद्धच्या मीरपूर वनडेमध्ये त्याने 82 धावांची शानदार खेळी केली.

श्रीलंका वनडेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग.