WTC Final: गेम ऑन! भारत सलग दुसऱ्यांदा फायनल खेळणार, शर्यतीत एकूण सहा संघ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WTC 2021-23 team India equation

WTC Final: गेम ऑन! भारत सलग दुसऱ्यांदा खेळणार फायनल, शर्यतीत एकूण सहा संघ

WTC 2021-23 Team India Equation : ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० असा पराभव केला. ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेन आणि मेलबर्न येथे झालेले पहिले दोन कसोटी सामने सहज जिंकले होते; तर सिडनी येथील कसोटी सामना अनिर्णीत राहिला आहे.

दक्षिण आफ्रिकाच्या संघाला सिडनी येथील शेवटची कसोटी न जिंकता आल्याने भारताची ‘जागतिक कसोटी अजिंक्यपद’ स्पर्धेची अंतिम फेरी खेळण्याची शक्यता वाढली आहे. भारताचा संघ सध्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच श्रीलंकेचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे.

हेही वाचा: Hind Kesari Kitab : 'हिंद केसरी'ची गदा यंदा महाराष्ट्राकडे! पुण्याच्या अभिजीतने मारलं मैदान

हा सामना न जिंकता आल्याने ऑस्ट्रेलियाला फारसे नुकसान झाले नसले, तरी त्यांना भारतात होणाऱ्या चार कसोटी सामन्यांवर अवलंबून राहावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियाचे अंतिम फेरीतील स्थान जवळपास पक्के असले, तरी ते कोणत्या क्रमांकाने अंतिम फेरीत खेळणार हे या भारतातील चार सामन्यांच्या मालिकेवर अवलंबून असणार आहे.

या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचण्यासाठी ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि भारत या तीन संघांमध्ये तीव्र स्पर्धा असणार आहे. दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडिजविरुद्ध मायदेशात दोन कसोटी सामने खेळणार आहे. शिवाय भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बॉर्डर गावसकर करंडक होणार आहे.

हेही वाचा: Virat Kohli Instagram Story : प्रसिद्धी म्हणजे एक रोग.... विराट कोहलीची इन्स्टा स्टोरी होतेय व्हायरल

दक्षिण आफ्रिकेचा चिवट खेळ

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमधील सिडनी येथे खेळविण्यात आलेला तिसरा कसोटी सामना अनिर्णीत राहिला आहे. ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले, तर डेव्हिड वॉर्नर मालिकावीर ठरला.