IND vs SL India Playing 11 : जागा 2 पर्याय 6! पांड्या सलामीसाठी करणार वेगळा विचार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs SL 1st T20 Team India Playing 11 Hardik Pandya

IND vs SL India Playing 11 : जागा 2 पर्याय 6! पांड्या सलामीसाठी करणार वेगळा विचार?

IND vs SL 1st T20 Team India Playing 11 : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी 20 सामन्यांची मालिका 3 जानेवारी 2023 पासून सुरू होत आहे. पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 3 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत सेमी फायनलमध्ये पराभूत झाला होता.

त्यानंतर संघात अनेक बदल करण्यात आले आहे. या बदलांसह भारतीय संघाची ही पहिलीच टी 20 मालिका असणार आहे. भारताचा युवा संघ आशिया कप विजेत्या श्रीलंकेशी भिडणार आहे. या संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले असून पहिल्या सामन्यासाठी प्लेईंग 11, टीम कॉम्बिनेशन ठरवण्याचा मोठा टास्क त्याच्यासमोर असणार आहे.

हेही वाचा: Rishabh Pant : पंत कसा होणार बरा?.. मंत्र्यांपासून अभिनेत्यांपर्यंत सर्वच लावत आहेत रांगा

हार्दिक पांड्याला संघनिवड करताना काही कठोर निर्णय देखील घ्यावे लागणार आहेत. याचबरोबर पांड्याला रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली यांची जागा कोण घेणार हे ठरवायचं आहे. यासाठी हार्दिक पांड्याकडे बरचेच पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळेच हार्दिकची प्लेईंग 11 निवडताना डोकेदुखी वाढणार आहे.

इशान किशन हा यापूर्वी बॅकअप प्लॅन म्हणून टीम इंडियात होता. आता त्याला सलामीवीर म्हणून आजमावून पाहण्यात येईल. इशान किशनने नुकतेच बांगलादेशविरूद्धच्या वनडे सामन्यात द्विशतक झळकावले होते. याचबरोबर त्याने रणजी ट्रॉफीत देखील आक्रमक शतकी खेळी केली होती. मात्र इशान किशनची टी 20 कारकिर्द ही चढ उतारांनी भरलेली राहिली आहे.

IND vs SL 1st T20: भारताची संभाव्य प्लेईंग 11

इशान किशन

ऋतुराज गायकवाड

सूर्यकुमार यादव

संजू सॅमसन

हार्दिक पांड्या

वॉशिंग्टन सुंदर

अक्षर पटेल

हर्षल पटेल

उमरान मलिक

युझवेंद्र चहल

अर्शदीप सिंग

हेही वाचा: Rohit Sharma : सगळे समाधानी! बीसीसीआयने कर्णधार रोहित शर्माला दिला मोठा दिलासा

हार्दिक पांड्याकडे सलामीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. इशान किशन सोबत ऋतुराज गायकवाडला संधी मिळू शकते. मात्र भारताकडून खेळताना त्याला मिळालेल्या संघाची पूर्ण फायदा उचलता आलेला नाही. दुसरीकडे हार्दिककडे शुभमन गिल, राहुल त्रिपाठी असे काही पर्याय देखील उपलब्ध आहेत. याचबरोबर वेगळा विचार करायचा झालाच तर संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव हे दोन पर्याय देखील आहेतच. मात्र हार्दिक त्यांना मधल्या फळीतच खेळवेल असे दिसते. (Sports Latest News)

सूर्यकुमार यादवसाठी गेले वर्ष अत्यंत चांगले गेले होते. त्यामुळे सूर्यकुमार तिसऱ्या क्रमांकावरच फलंदाजीला येऊ शकतो. आता त्याच्यावर उपकर्णधारपदाची देखील जबाबदारी असणार आहे. सूर्यकुमारने न्यूझीलंड दौऱ्यावर टी 20 मध्ये शतकी खेळी केली होती. हाच फॉर्म 2023 मध्ये देखील कायम ठेवण्याचा प्रयत्न तो करेल. संजू सॅमसन हा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. तो राजस्थान रॉयल्सकडून खेळताना देखील याच क्रमांकावर फलंदाजी करतोय. कर्णधार हार्दिक पांड्या पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरले.

हेही वाचा : Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?