IND vs SL: 6,6,6,6,6,6,4,4,4... अक्षरचा तांडव! ९ चेंडू ठोकले जवळपास अर्धशतक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs Sri Lanka Match

IND vs SL: 6,6,6,6,6,6,4,4,4... अक्षरचा तांडव! ९ चेंडू ठोकले जवळपास अर्धशतक

India vs Sri Lanka Match : पुण्यात झालेल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाला 16 धावांनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. यासह दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. आता तिसरा आणि निर्णायक सामना शनिवारी 7 जानेवारीला राजकोटमध्ये होणार आहे.

मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले असेल, पण यामध्ये सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल यांनी आपली चमक दाखवली आहे. तुफानी खेळी खेळून या दोघांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांची क्लास लावली होती. सूर्या आणि अक्षरने हा सामना जवळपास उधळला.

हेही वाचा: IND vs SL: टीम इंडियामध्ये 'या' खेळाडूची T20 कारकीर्द आता पणाला!

16व्या षटकाच्या 5व्या चेंडूवर सगळा गोंधळ झाला, जेव्हा सूर्या फिफ्टी केल्यानंतरच बाद झाला. इथून टीम इंडियाला 25 चेंडूत 59 धावांची गरज होती. सूर्या 36 चेंडूत 51 धावा करून बाद झाला. अक्षर पटेलसह त्याने सहाव्या विकेटसाठी 91 धावांची जलद भागीदारी केली. यादरम्यान त्याने 3 षटकार आणि तब्बल 3 चौकार लगावले. सूर्याचा स्ट्राइक रेट 141.67 होता.

हेही वाचा: IND vs SL: अर्शदीपच्या कृतीमुळे हार्दिक नाराज; 'तोंड दाखवायला कुठेच ठेवली नाही जागा'

या सामन्यात अक्षर पटेलने ठोकले 6 षटकार

सूर्या बाद झाल्यानंतर अक्षर पटेलने पदभार स्वीकारला. पण जेव्हा शेवटच्या षटकात विजयासाठी 21 धावांची गरज होती. त्याचवेळी अक्षर पटेलकडून पूर्ण अपेक्षा होत्या, पण तोही शेवटच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर झेलबाद झाला. येथूनच टीम इंडियाचा पराभव निश्चित झाला आणि 16 धावांनी सामना हरला. अक्षर पटेलने 31 चेंडूत 65 धावांची धडाकेबाज खेळी केली, ज्यात त्याने 6 षटकार आणि 3 चौकार लगावले. त्याचा स्ट्राईक रेट 209.68 होता. त्याने या ९ चेंडू जवळपास अर्धशतक ठोकले.

या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने 6 गडी गमावून 206 धावा केल्या. कर्णधार दासुन सनाकाने 22 चेंडूत 56 धावांची खेळी केली. तर कुसल मेंडिसने 31 चेंडूत 52 धावा केल्या. 207 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना भारतीय संघ 8 गड्यांच्या मोबदल्यात 190 धावाच करू शकला. अक्षरने 65 आणि सूर्याने 51 धावा केल्या.