IND vs SL: टीम इंडियामध्ये 'या' खेळाडूची T20 कारकीर्द आता पणाला!

टीम इंडियाचा एक खेळाडू या दोन्ही सामन्यांमध्ये पूर्णपणे फ्लॉप आता...
 Shubman Gill poor performance continue
Shubman Gill poor performance continue sakal

India vs Sri lanka T20 Series : भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाला 16 धावांनी पराभव स्वीकारावा लागला, तर मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाच्या नावावर होता. पण या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाचा एक खेळाडू पूर्णपणे फ्लॉप ठरला.

रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यांसारख्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत या खेळाडूला टी-20 कारकीर्द सुरू करण्याची संधी मिळाली, परंतु त्याचा फायदा घेण्यात तो अपयशी ठरला आहे.

 Shubman Gill poor performance continue
IND vs SL: अर्शदीपच्या कृतीमुळे हार्दिक नाराज; 'तोंड दाखवायला कुठेच ठेवली नाही जागा'

या मालिकेत टीम इंडियाची कमान सांभाळणाऱ्या हार्दिक पांड्याने पहिल्या दोन सामन्यांमध्ये युवा फलंदाज इशान किशन आणि शुभमन गिल यांना सलामीवीर म्हणून खेळण्याची संधी दिली. पण शुभमन गिल सलग दुसऱ्या सामन्यातही ही संधी वाया घालवताना दिसला. या दोन्ही सामन्यात शुभमन गिलला 10 धावांचा आकडाही गाठता आला नाही. या मालिकेतून शुभमन गिलने आपल्या T20 करिअरची सुरुवात केली होती.

 Shubman Gill poor performance continue
IND vs SL 2nd T20I : श्रीलंकेचा 2016 नंतरचा भारतात पहिला विजय; अक्षर - मावीची झुंज व्यर्थ

23 वर्षीय शुभमन गिलने मालिकेतील पहिल्याच सामन्यात आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यात त्याला 5 चेंडूंचा सामना करताना केवळ 7 धावा करता आल्या, ज्यात 1 चौकाराचा समावेश होता. त्याचवेळी दुसऱ्या सामन्यात शुभमन गिलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र तो यावेळीही फ्लॉप ठरला. शुभमन गिल या सामन्यात 3 चेंडूत केवळ 5 धावाच खेळू शकला. आगामी काळात त्याच्या खराब कामगिरीमुळे त्याच्या टी-20 कारकिर्दीवर पडदा पडू शकतो.

 Shubman Gill poor performance continue
IND vs SL : अक्षर - मावी शेवटपर्यंत झुंजले मात्र लंकेचा कर्णधार आला विजयाचा आडवा

शुभमन गिलने टीम इंडियासाठी 13 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामनेही खेळले आहेत. त्याने कसोटीत एक शतक आणि 4 अर्धशतकांच्या सहाय्याने 736 धावा केल्या आहेत तर एकदिवसीय सामन्यात त्याने एक शतक आणि 4 अर्धशतकांच्या मदतीने एकूण 687 धावा केल्या आहेत. त्याच्या फर्स्ट क्लास कारकिर्दीत त्याने 40 सामन्यांमध्ये दुहेरी शतकासह एकूण 3279 धावा केल्या आहेत. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 9 शतके आणि 16 अर्धशतके केली आहेत.

या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. श्रीलंकेने 20 षटकात 6 गडी गमावून 206 धावा केल्या आणि यजमानांना विजयासाठी 207 धावांचे लक्ष्य दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला 8 गड्यांच्या मोबदल्यात 190 धावाच करता आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com