India vs Sri Lanka, 2nd Test
India vs Sri Lanka, 2nd Test Sakal

IND vs SL : क्रिकेटच्या मैदानात दिसली मधमाशांची 'झुंड'

Published on

India vs Sri Lanka, 2nd Test : भारत आणि श्रीलंका यांच्यातील डे नाइट कसोटी सामना बंगळुरुच्या मैदानात सुरु आहे. दुसऱ्या दिवशीचा खेळाला सुरुवात होण्यापूर्वी खेळाडूंसोबत मधमाशांची 'झुंड' मैदानात उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. मधमाशा मैदानात घोंगावत असल्यामुळे काही काळ सामन्यात व्यत्यय देखील निर्माण झाला. काही मिनिटांनंतर खेळ सुरु झाला.

श्रीलंकेचा फलंदाज गार्ड घेत असताना साइट स्क्रीनवर काहीतरी हालचाल झाली. श्रीलंकन फलंदाजाला पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात आली. ज्यावेळी कॅमेरा त्या बाजूला वळला तेव्हा मधमाशा घोंगावत असल्याचे दिसून आले. त्यामुळे सामना चार-पाच मिनिट थांबवण्यात आला.

India vs Sri Lanka, 2nd Test
वा रे माझ्या नवरोबा, तू तर... संजनाचं बुमराहसाठी खास ट्विट

दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत श्रीलंकेला ठराविक अंतराने धक्के दिले. 6 षटकात अवघ्या 23 धावांत श्रीलंकेनं 4 विकेट गमावल्या. भारतीय संघाने दुसऱ्या डावाला सुरुवात केली असून दोन्ही सलामीवीर तंबूत परतले आहेत.

भारतीय संघाने मोहाली कसोटी जिंकून दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. बंगळुरुच्या मैदानातील कसोटी सामना जिंकून पाहुण्यांना क्लीन स्विप करण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरली आहे. पहिल्या डावात भारतीय संघाचा डाव 252 धावांत आटोपला. त्यानंतर श्रीलंकेला 109 धावांत गुंडाळत भारतीय संघाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दुसरी कसोटी खेळत आहे. या सामन्यासह भारतीय संघाने मालिका जिंकली तर रोहित शर्माच्या नावे खास रेकॉर्डची नोंद होईल. तो कॅप्टन झाल्यानंतर भारतीय संघाने जो सामना खेळलाय त्यात त्यांनी प्रतिस्पर्धाला व्हाईट वॉश दिला आहे. टी-20, वनडेनंतर आता कसोटीत टीम इंडियाला ही संधी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com