लंकेला ढेर करण्यासाठी 5 कसोटीत 36 विकेट घेणारा 'शेर' संघात

Axar Patel
Axar Patel Sakal

India vs Sri Lanka, 1st Test : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मोहालीच्या मैदानात दिमाखदार विजय नोंदवत कसोटी मालिकेत विजयी सलामी दिली. बंगळुरुच्या मैदानात रंगणाऱ्या दुसऱ्या कसोटीतही याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल. या सामन्यातून 28 वर्षीय अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल (Axar Patel) टीम इंडियात कमबॅक करेल.

दुखापतीतून सावरुन तो पुन्हा संघाकडून खेळण्यासाठी सज्ज आहे. कुलदीप यादवच्या (Kuldeep Yadav) जागी त्याची संघात एन्ट्री झाल्याचे वृत्त आहे. दुखापतीमुळे अक्षर पटेल दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकला होता. एवढेच नाही तर घरच्या मैदानावर झालेल्या वेस्ट इंडीज विरुद्धच्या मालिकेतही तो संघाचा भाग नव्हता. अक्षर पटेल याला कोरानाची लागणही झआली होती.

Axar Patel
PAK vs AUS: तुझं नाव कसं घेऊ? पाकिस्तानची यंग गर्ल चर्चेत

बीसीसीआयच्या (BCCI) एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, अक्षर पटेला हा टीम इंडियाचा पहिल्या पसंतीचा खेळाडू आहे. तो फिट नसल्यामुळे त्याचा बॅकअप म्हणून कुलदीप यादवला संघात स्थान देण्यात आले होते. ते पुढे म्हणाले की, अक्षर पटेल आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे. त्यामुळे कुलदीप यादवला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. कुलदीप यादव याआधी मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये कसोटी सामना खेळला होता. पहिल्या कसोटी सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नव्हते.

Axar Patel
शेन वॉर्नचा विचित्र डाएट प्लॅन; मॅनेजरनं शेअर केली गोष्ट

अक्षर पटेल याने खूप कमी वेळात आपली विशेष छाप सोडली आहे. कसोटीमध्येत्याने पाच सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. 10 डावात 11.9 च्या सरासरीने त्याने 36 विकेट घेतल्या आहेत. त्याने पाच वेळा पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला असून एकदा चार विकेट घेतल्या आहेत. 38 धावा करुन सहा विकेट ही त्याची कसोटीतील सर्वोच्च कामगिरी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com