VIDEO : बुमराहनं बोल्ड उडवला; पण नो बॉल पडला!

Jasprit Bumrah
Jasprit Bumrah Sakal

मोहाली : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने (Team India) मजबूत पकड मिळवली आहे. दुसऱ्या दिवशी रविंद्र जाडेजाच्या दमदरा 174 धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने 8 बाद 574 धावांवर डाव घोषीत केला. श्रीलंकेन दुसऱ्या दिवसाअखेर आपल्या पहिल्या डावात चार विकेट गमावल्या आहेत.

सलामीवीर दिमुथ करुणारत्ने 28(71), लाहिरु तिरिमाने 17(60), अँजेलो मॅथ्यूज 22 (39) आणि धनंजया डिसिल्वा 1 (12) धावा करुन माघारी फिरले. अश्विनने दोन तर जाडेजा आणि जसप्रित बुमराहने (Jasprit Bumrah) दुसऱ्या दिवसाअखेर एक-एक विकेट मिळवली होती. निसांकाही बोल्ड झाला होता. पण बुमराहचा तो चेंडू नो बॉल निघला आणि त्याला फुकाचे जीवनदान मिळाले. 75 चेंडूचा सामना करुन तो 26 धावांवर नाबाद राहिला. बुमराहने टाकलेला हा चेंडू आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील पाकिस्तान विरुद्धच्या कटू आठवणीला उजाला देणारा होता.

Jasprit Bumrah
IND W vs PAK W : पाक विरुद्ध मिताली ब्रिगेडनं आखलाय खास प्लॅन

श्रीलंकेच्या पहिल्या डावातील 32 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर जसप्रित बुमराहने पाथुम निसांकाला बोल्ड केले. याचा बुमराहनं आनंदही साजरा केला. मात्र अंपायरने नो बॉल दिला आणि आनंद क्षणातच गळून पडला. कर्णधार रोहित शर्मानेही बुमराहच्या फुटवर्कमधील बेफिक्रेपणावर नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.

Jasprit Bumrah
IND vs SL: रोहित तूने क्या किया! नेटकऱ्यांना आठवला द्रविडचा 'कडूपणा'

भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशी एकूण 43 षटके गोलंदाजी केली. यात रविंद्र जाडेजाने तीन तर जयंत यादवने दोन नो बॉल टाकले. मोहम्मद शमी आणि बुमराहने एक-एक नो बॉल टाकून यात आणखी भर घातली. बुमराहचा नो बॉल टीम इंडियासाठी निराशजनक ठरला. कारण जर हा बॉल योग्य असता तर दुसऱ्या दिवसाअखेर श्रीलंकेचा अर्धा संघ तंबूत गेल्याचे चित्र पाहायला मिळाले असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com