esakal | श्रीलंकेच्या ताफ्यात कोरोना, धवन ब्रिगेडच्या दौऱ्याच काय?
sakal

बोलून बातमी शोधा

SL vs IN

श्रीलंकेच्या ताफ्यात कोरोना, धवन ब्रिगेडच्या दौऱ्याच काय?

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारत आणि श्रीलंका श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील द्विपक्षीय मालिकेवर संकट घोंगावत आहे. इंग्लंड दौऱ्यावरुन परतलेल्या श्रीलंका संघाचे फलंदाजी प्रशिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. इंग्लंड दौऱ्यावरुन परतल्यानंतर 48 तासानंतर ग्रँट फ्लॉवर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिका 13 जुलैपासून नियोजित आहे. इतर खेळाडू कठोर क्वारंटाईन असल्यामुळे बोर्डाकडून मालिका खेळवण्याचा संपूर्ण प्रयत्न निश्चित केला जाईल.

इंग्लंड दौऱ्यातून परतल्यानंतर टीममधील सर्व खेळाडू कठोर क्वांरटाईनच्या नियमावलीचे पालन करत आहेत. श्रीलंका संघ इंग्लंड दौऱ्यावर ज्या संघाविरुद्ध खेळला त्या संघातील खेळाडू आणि स्टाफ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ माजली होती. 7 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर इंग्लंडने पाकिस्तान दौऱ्यासाठी नवा संघ निवडला होता.

हेही वाचा: End vs PAK 1st ODI : नवख्या इंग्लंड संघानं उडवला पाकचा धुव्वा

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने एका निवेदनाच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिलीये. त्यांनी निवेदनात म्हटलंय की, श्रीलंका संघाचे बॅटिंग कोच ग्रँट फ्लॉवर यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. संघातील इतर खेळाडू क्वांरटाईन आहेत. अन्य खेळाडू आणि कोचिंग स्टाफचा टेस्ट करण्यात आली आहे, असेही बोर्डाने स्पष्ट केले.

झिम्बाब्वेचे माजी क्रिकेटर ग्राँट फ्लॉवर बऱ्याच काळापासून श्रीलंकन संघासोबत आहेत. श्रीलंकेचा संघ नुकताच इंग्लंड दौऱ्यावरुन परतला आहे. इंग्लंड दौऱ्यावरील वनडे आणि टी-20 मालिकेत श्रीलंकेची कामगिरी खूपच निराशजन राहिली होती. त्यांना एकही सामना जिंकता आला नव्हता. इंग्लंड दौऱ्यावर काही वरिष्ठ खेळाडूंनी कोरोना प्रोटोकॉलचं उल्लंघन केल्याचे वृत्तही समोर आले होते. निरोशन डिक्वेला, धनंजय डीसिल्वा आणि कुसल मेंडिस या तिघांना याची मोठी किंमत मोजावी लागली. त्यांना दौऱ्यावरुन माघारी बोलवण्यात आले होते.

हेही वाचा: VIDEO : स्लो इनिंगचा 'बापमाणूस', 3 धावांसाठी खेळले 100 चेंडू

13 जूलैपासून वनडे सामन्याने भारतीय संघ श्रीलंका दौऱ्याची सुरुवात करणार आहे. या मालिकेसाठी शिखर धवनकडे भारतीय संघाची धूरा देण्यात आली आहे. राहुल द्रविड या दौऱ्यावर मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील प्रमुख खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर असताना श्रीलंका दौऱ्यावर नवख्या खेळाडूंना संधी मिळाली आहे. आगामी टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनेही भारतीय संघासाठी हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. पण कोरोनामुळे यावर भीतीचे सावट पसरले आहे.

loading image