कुणाला जमलं नाही ते रोहितनं करुन दाखवलं; विराटलाही टाकलं मागे

Rohit Sharma big Record as captain
Rohit Sharma big Record as captain Sakal
Updated on

भारतीय संघाने वेस्ट इंडीजला व्हाईट वॉश देत दिमाखात मालिका जिंकली. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली पहिल्या वनडेत मिळेलाला हा विजय टीम इंडियासाठी (Team India) खास असाच आहे. टीम इंडियाने बाराव्या वेळी प्रतिस्पर्धी संघाला व्हाईट वॉश केलं. आतापर्यंत भारतीय संघाने वेस्ट इंडीजला एकदाही क्लीन स्वीप दिली नव्हती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ही गोष्ट करुन दाखवली. त्यामुळे रोहित शर्माच्या नावे पूर्ण वेळ कॅप्टन्सी करताना पहिल्याच वनडे मालिकेत खास विक्रमाची नोंद झाली.

एमएस धोनी (MS Dhoni) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने प्रत्येकी 3-3 वेळा वनडे मालिकेत प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप केले आहे. त्यांच्याशिवाय कपिल देव, दिलीप वेंगसरकर, मोहम्मद अझरुद्दीन, गौतम गंभीर आणि अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियने प्रतिस्पर्धी संघाला व्हाईट वॉश केलं आहे. पण पहिल्यांदाच टीम इंडियाने वेस्ट इंडीजला व्हाईट वॉश केले आहे.

Rohit Sharma big Record as captain
IPL Auction 2022 : सामना टाय सुपर ओव्हर; बोली समान लावली तर काय?

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा वेस्ट इंडीज विरुद्धचा 11 वा विजय आहे. 13 वनडेत त्याने 11 वा विजय मिळवून विराट कोहलीला मागे टाकले. क्लाइव्ह लॉयड, इंझमाम उल हक आणि मिस्बाह उल हक हे दिग्गज रोहितच्या पुढे आहेत. या तिघांच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडीजला त्यांच्या संघाने 12 वेळा पराभूत केले आहे.

Rohit Sharma big Record as captain
वेस्ट इंडीज व्हाईट वॉश; वनडे मालिकेतही रोहित ब्रिगेडची दमदार सलामी

वेस्ट इंडीज विरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात रोहित शर्मानं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्याचा हा निर्णय कॅरेबियन फलंदाजांनी फोल ठरवला. रोहित शर्मासह विराट कोहली आणि शिखर धवन स्वस्तात माघारी फिरले. आघाडीचे फलंदाज स्वस्तात आटोपल्यानंतर पंत आणि श्रेयस अय्यरनं संघाचा डाव सावरला. या जोडीनं चौथ्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी केली. यांच्याशिवाय वाशिंग्टन आणि दीपक चाहर यांनी तळाच्या फलंदाजीत अर्धशतकी खेळी साकारत टीम इंडियाच्या धावफलकावर 265 धावा लावल्या. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचा संघ पुन्हा कोलमडला. ओडेन स्मिथच्या 36, अल्झारी जोसेफ 29 आणि निकोलस पूरनच्या 34 धावा वगळता कुणालाही भारतीय गोलंदाजांसमोर उभे राहता आले नाही. कॅरेबियन संघ 37.1 षटकात 169 धावांत आटोपला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com