वेस्ट इंडीज व्हाईट वॉश; वनडे मालिकेतही रोहित ब्रिगेडची दमदार सलामी

India vs West Indies
India vs West IndiesSakal News

India vs West Indies, 3rd ODI : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वनडे मालिकेतही प्रतिस्पर्ध्याला व्हाईट वॉश दिला आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेत टीम इंडियाने वेस्ट इंडीजला 96 धावांनी पराभूत करत तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली. याआधी संघाचे पूर्णवेळ नेतृत्व स्विकारल्यानंतर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) न्यूझीलंडला तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत व्हाईट वॉश दिला होता.

त्यानंतर आता वनडेतही रोहितच्या नेतृत्वाची तशीच झलक पाहायला मिळाली. तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात आघाडी कोलमडल्यानंतर श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनी केलेल्या दमदार खळीच्या जोरावर टीम इंडियाने निर्धारित 50 षटकात सर्व बाद 365 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचा डाव 169 धावांत आटोपला. भारतीय संघाने तिसरा आणि अखेरचा सामना 96 धावांनी जिंकला. (Rohit Sharma Lead Team Inida whitewashed West Indies in ODI New Zealand in T20I)

India vs West Indies
टी-20 मालिकेसाठी ऋतुराजसह दीपक हुड्डा टीम इंडियात

भारतीय संघाने (Team India) यापूर्वीच्या दोन सामन्यातील विजयासह मालिका आधीच खिशात घातली होती. तिसरा आणि अखेरचा सामना जिंकत रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वनडेतही धडाका कायम ठेवला. रोहितच्या कॅप्टन्सीमध्ये पहिल्या वनडे मालिकेतही टीम इंडियाने वेस्ट इंडीजला व्हाईट वॉश दिला.

India vs West Indies
IND vs WI T20 : टीम इंडियाला मोठा धक्का, KL राहुल-अक्षर पटेल आउट

भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजची सुरुवात पुन्हा खराब झाली. आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी फिरले. पोलार्डच्या अनुपस्थितीत वेस्ट इंडीज संघाचे नेतृत्व करणाऱ्या निकोलस पूरनने 34 तर ओडेन स्मिथनं संघाकडून सर्वाधिक 36 धावांची खेळी केली. या दोघांशिवाय अन्य कुणालाही मैदानात तग धरता आला नाही. भारताकडून कुलदीप यादव 2, प्रसिद्ध कृष्णा 3, दीपक चाहर 2 आणि मोहम्मद सिराज याने 3 विकेट घेतल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com