Ind vs Wi : संघाची घोषणा होताच 'या' 3 खेळाडूंची करिअर संपली! BCCI चे स्पष्ट संकेत

Team India
Team Indiasakal

India vs West Indies T20 Team : निवड समितीने वेस्ट इंडिजसाठी भारतीय टी-20 संघाची घोषणा केली आहे. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर टीम इंडियामध्ये असे तीन खेळाडू आहेत, ज्यांना विंडीज दौऱ्यासाठी निवडकर्त्यांनी दुर्लक्षित केले आहे. या खेळाडूंना चांगली कामगिरी करता आली नसल्याने टीम इंडियातून बाहेर आहेत.

Team India
Ind vs Wi : 'आमचे सध्याचे कोच राहुल भाई...' वेस्ट इंडिज दौऱ्यापुर्वी अश्विनने केलं मोठे वक्तव्य

भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार गेल्या अनेक दिवसांपासून खराब फॉर्मशी झुंजत आहे. 2022 च्या टी-20 विश्वचषकातही तो आपल्या नावाप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. यानंतरही त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत संधी मिळाली, मात्र तो प्रभावित करण्यात अपयशी ठरला. यानंतर त्याला श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून वगळण्यात आले. भुवनेश्वरने शेवटचा सामना 22 नोव्हेंबर 2022 रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. त्याने टीम इंडियासाठी 87 टी-20 सामन्यात 90 विकेट घेतल्या आहेत.

Team India
Ind vs Wi : आगरकरने CSK च्या खेळाडूंना डावललं! देशपांडेच्या जागी आवेश खान, ऋतुराजला देखील दाखवला कट्टा

रविचंद्रन अश्विन हा सध्या भारतीय संघातील कसोटीतील सर्वोत्तम गोलंदाज आहे, पण पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये तो चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळाले, परंतु तो चांगली कामगिरी करू शकला नाही आणि तेव्हापासून तो टीम इंडियाच्या बाहेर आहे.

त्याने भारतासाठी शेवटचा सामना 10 नोव्हेंबर 2022 रोजी इंग्लंडविरुद्ध खेळला. आता त्याची जागा युवा फिरकीपटूंनी संघात घेतली आहे. यामध्ये रवी बिश्नोई आणि युझवेंद्र चहल या खेळाडूंचा समावेश आहे. अश्विनने भारतीय संघासाठी 65 टी-20 सामन्यात 72 विकेट घेतल्या आहेत.

Team India
IND vs WI : रोहितने 'या' खेळाडूंची संघातून केली हकालपट्टी! कर्णधार पांड्याची मास्टर कार्ड खेळी अन्...

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवड समितीने हर्षल पटेलला भारतीय संघात संधी दिलेली नाही. 2022 च्या टी-20 विश्वचषकात त्याला संधी मिळाली, पण तो प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकला नाही. यानंतर त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही स्थान मिळाले नाही. आयपीएल 2023 मध्ये आरसीबीकडून खेळताना तो काही विशेष कामगिरी करू शकला नाही. अशा स्थितीत त्याच्या कारकिर्दीवर संकटाचे ढग घिरट्या घालताना दिसत आहेत. त्याने भारतीय संघासाठी आतापर्यंत 25 टी-20 सामन्यात 29 बळी घेतले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com