Ind vs Wi : आगरकरने CSK च्या खेळाडूंना डावललं! देशपांडेच्या जागी आवेश खान, ऋतुराजला देखील दाखवला कट्टा

Agarkar dropped the CSK players
Agarkar dropped the CSK playerssakal

Ind vs Wi T20 Series Squad : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. वनडे आणि कसोटी संघाच्या घोषणेनंतर आता टी-20 संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यातील टी-20 सामन्यांसाठी हार्दिक पांड्याकडे टीम इंडियाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. या मालिकेसाठी अनेक नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

त्याचबरोबर संघातील अनेक वरिष्ठ खेळाडू पुन्हा एकदा टी-20 मधून बाहेर पडले आहेत. मात्र आयपीएलमध्ये नुकतीच चमकदार कामगिरी करणाऱ्या या संघातून एका खेळाडूला वगळण्यात आले आहे. कुठेतरी या खेळाडूने आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर आपल्या संघाला आयपीएलचे विजेतेपदही मिळवून दिले आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून ऋतुराज गायकवाड आहे.

Agarkar dropped the CSK players
IND vs WI : रोहितने 'या' खेळाडूंची संघातून केली हकालपट्टी! कर्णधार पांड्याची मास्टर कार्ड खेळी अन्...

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीची पहिली पसंती मानल्या जाणाऱ्या ऋतुराज गायकवाडला टीम इंडियाच्या टी-20 संघात संधी देण्यात आलेली नाही. गायकवाडला टीम इंडियातून वगळण्यात आल्यानंतर आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करूनही त्याला संघात संधी का मिळाली नाही, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

गायकवाडने यावर्षी 16 सामन्यात 42.12 च्या सरासरीने 590 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने 147.50 च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटनेही फलंदाजी केली आहे. चाहत्यांच्या मते ईशान किशनऐवजी गायकवाडला टीम इंडियामध्ये संधी मिळू शकली असती. टीम इंडियाने मागच्या वेळी टी-20 सामना खेळला तेव्हा गायकवाड संघाचा भाग होता.

Agarkar dropped the CSK players
PCB Chairman : पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! नजम सेठीच्या जागी नव्या अध्यक्षांची घोषणा

आयपीएल 2023 चे विजेतेपद यावर्षी चेन्नई सुपर किंग्जने जिंकले. धोनीच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा चॅम्पियन बनलेल्या संघातील एकाही खेळाडूला वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत संधी मिळू शकली नाही. अशा परिस्थितीत चॅम्पियन संघातील एकही खेळाडू टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाकडून खेळू शकत नसताना आयपीएलचे आयोजन का केले जाते, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

या संघात ऋतुराज गायकवाड व्यतिरिक्त शिवम दुबे आणि तुषार देशपांडे यांना संधी मिळू शकते. आवेश खानच्या अत्यंत खराब हंगामानंतरही त्याला संघात संधी मिळाली, मात्र 25 विकेट घेतल्यानंतरही देशपांडे संघात स्थान मिळवू शकले नाहीत. या सगळ्यामुळे चाहत्यांची निराशा झाली आहे.

Agarkar dropped the CSK players
Wi vs Ind T20 Squad: BCCI ने 'या' खेळाडूंची टी-20 कारकीर्द संपवली! वेस्ट इंडिज दौऱ्यातून अचानक दिला डच्चू

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ : इशान किशन (विकेटकीप), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com