पाहुण्यांनी टेकले गुडघे; रोहित ब्रिगेडनं वनडे मालिका जिंकली! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs West Indies, 2nd ODI

पाहुण्यांनी टेकले गुडघे; रोहित ब्रिगेडनं वनडे मालिका जिंकली!

India vs West Indies, 2nd ODI : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सलग दुसऱ्या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांची मालिका खिशात घातली. पोलार्डच्या अनुपस्थितीत वेस्ट इंडीज संघाचे नेतृत्व करणाऱ्या निकोलस पूरननं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाने जे पहिल्या वनडेत केलं तसा डाव त्याने आखला. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांनी दमदार सुरुवातही करुन दिली. पण सुर्यकुमार यादव आणि लोकेश राहुलची दमदार खेळी आणि त्यानंतर गोलंदाजीत प्रसिद्ध कृष्णाचा भेदक मारा यामुळे वेस्ट इंडीजचा प्लॅन फेल ठरला. भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचा डाव 193 धावांत आटोपला. भारतीय संघाने या सामन्यासह तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली. तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे जिंकून कॅरेबियन ताफ्याला व्हाईट वॉश देण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल.

भारतीय संघाने (Team India) पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 237 धावा करुन पाहुण्या वेस्ट इंडीजसमोर (West Indies) 238 धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजची सुरुवात भारतीय संघाच्या तुलनेत चांगली झाली. पण धावफलकावर 32 धावा असताना प्रसिद्ध कृष्णानं (Prasidh Krishna) सलामी जोडी फोडली आणि टीम इंडियाला मोठा दिलासा दिला.

हेही वाचा: IND vs WI 2nd ODI : प्रसिद्ध कृष्णाचा चौका; अन् बरंच काही

तो इथेच थांबला नाही. त्याने डॅरेन ब्रावोच्या रुपात वेस्ट इंडीजला आणखी एक धक्का दिला. ठराविक अंतराने दोन विकेट गमावलेल्या वेस्ट इंडीजची चहलने फिरकी घेतली. त्याने शाई होपला बाद करत वेस्ट इंडीजच्या अडचणी वाढवल्या. शमर्थ ब्रुक्सनं (Shamarh Brooks) एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला. त्याने केलेल्या 44 धावा आणि अकेला हुसैनच्या 34 धावा वगळता अन्य कॅरेबियन फलंदाज सपशेल अपयशी ठरले.

हेही वाचा: पंत बदनाम हुआ! डार्लिंग नव्हे तर कॅप्टन रोहितमुळे

रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने जिंकलेली ही पहिली वनडे मालिका आहे. या आधी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 मध्ये न्यूझीलंडला व्हाईट वॉश केलं होते. आता वनडे मालिकेतील तिसरा सामना जिंकून तिच पुनरावृत्ती वनडे मालिकेत करण्यासाठी टीम इंडिया उत्सुक असेल.

Web Title: Ind Vs Wi Team India Seal Odi Series Suryakumar Yadav Kl Rahul Prasidh Krishna Shines

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..