पंत बदनाम हुआ! डार्लिंग नव्हे तर कॅप्टन रोहितमुळे

Rishabh Pant On Rohit Sharma
Rishabh Pant On Rohit SharmaSakal News

Rishabh Pant On Rohit Sharma: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात वनडे मालिका सुरु आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात कर्णधार रोहित शर्मानं चक्क रिषभ पंतच्या साथीनं डावाला सुरुवात करुन सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. टीम इंडियाचा हा प्रयोग यशस्वी ठरला नाही. रोहित शर्मा 5 तर पंत 18 धावा करुन बाद झाला. ही जोडी संघाला दमदार सुरुवात करुन देण्यात अपयशी ठरली असली तरी या प्रयोगाची चर्चा चांगलीच रंगली आहे. याशिवाय आणखी एक गोष्ट चर्चेत आहे ती म्हणजे दुसऱ्या वनडे आधी रिषभ पंतने कर्णधार रोहित शर्माची घेतलेली फिरकी.

स्टार स्पोर्ट्सच्या एका मुलाखतीमध्ये रिषभ पंतने (Rishabh Pant) टीम इंडियाचा नवा कॅप्टन रोहित शर्माबाबतची (Rohit Sharma) एक गोष्ट सांगितली आहे. या कार्यक्रमात पंतला सहकारी खेळाडूंबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. टीममधील कोणत्या खेळाडूच्या रुममध्ये पसारा इकडे तिकडे पसरेला असतो? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. त्यावेळी पंतने कर्णधार रोहित शर्माचे नाव घेतले.

Rishabh Pant On Rohit Sharma
'डेफिनेट्ली रोहित सिस्टिम'; DRS वरुन हिटमॅनची धोनीशी तुलना

यावेळी पंतने रोहित शर्माने इन्स्टास्टोरीच्या माध्यमातून शेअर केलेल्या फोटोचा खुलासा केला. तो म्हणाला की, रोहित शर्माने एक फोटो पोस्ट केली होती. या फोटोत रुममध्ये सगळे अस्थाव्यस्थ पडल्याचे दिसले होते. हा फोटो पंतच्या रुममधील आहेत, असेही त्याने म्हटले होते. पण खरी गोष्ट ही आहे की, ती रुम रोहित भय्याचीच होती. त्या फोटोमुळे मी उगाच बदनाम झालो.

Rishabh Pant On Rohit Sharma
VIDEO : सुर्यावर KL राहुल भडकला; चूक कुणाची तुम्हीच ठरवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com