Shamar Joseph Injury Update
esakal
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. मात्र, त्यापूर्वीच वेस्ट इंडीज संघाला मोठा धक्का बसला आहे. वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज शमार जोसेफला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याने या मालिकेतून माघार घेतली आहे. दरम्यान, जोसेफला नेमकी कोणती दुखापत झाली, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.