IND vs WI: 'कधीही वाटलं नव्हतं...', कोहलीने कोच द्रविडसाठी लिहिली भावनिक पोस्ट

Rahul Dravid And Virat Kohli In Dominica Test
Rahul Dravid And Virat Kohli In Dominica Test

Rahul Dravid And Virat Kohli In Dominica Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना 12 जुलैपासून खेळल्या जाणार आहे. हा सामना डॉमिनिका येथील विंडसर पार्क क्रिकेट मैदानावर होणार आहे. टीम इंडियाने शेवटचा कसोटी सामना 2011 मध्ये येथे खेळला होता. त्या सामन्यात विराट कोहलीसोबत सध्याचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी भारतीय कर्णधार राहुल द्रविड देखील टीम इंडियाचा एक भाग होता. याचा खुलासा खुद्द विराट कोहलीने केला आहे.

Rahul Dravid And Virat Kohli In Dominica Test
ICC ची चिंता वाढली! ODI मालिकांचे भवितव्य अंधारात; 'टी-20 लीग'मध्ये खेळण्यावर निर्बंध?

कोहलीने त्याच्या अधिकृत सोशल मीडियाद्वारे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसोबतचा एक फोटो शेअर केला. कोहलीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “2011 मध्ये डॉमिनिका येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटीत फक्त दोनच खेळाडू होते. ही मालिका आपल्याला वेगवेगळ्या क्षमतेने इथे परत आणेल असे कधीच वाटले नव्हते. खूप कृतज्ञ."

त्यावेळीस भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळली, ज्यामध्ये तिसरी कसोटी डॉमिनिका येथे खेळली गेली आणि सामना अनिर्णित राहिला. या सामन्याच्या पहिल्या डावात राहुल द्रविडने 5 धावा आणि दुसऱ्या डावात 34 धावा केल्या. त्याचवेळी विराट कोहलीने एकच डाव खेळला असून तो 30 धावा करू शकला.

Rahul Dravid And Virat Kohli In Dominica Test
Ashes 2023 Eng vs Aus: अ‍ॅशेसमध्ये इंग्लंडचा जबरदस्त पलटवार, तिसऱ्या कसोटीत सामन्यात ऑस्ट्रेलियाला नमवले

तिसरी कसोटी अनिर्णित राहिल्याने भारतीय संघाने मालिका 1-0 अशी जिंकली होती. विराट कोहलीची ही पदार्पण कसोटी मालिका होती. या मालिकेतील पहिल्याच सामन्यातून विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. विराट कोहली आणि राहुल द्रविड यांनी वेस्ट इंडिजमध्ये शेवटची कसोटी मालिका एकत्र खेळण्याची ही शेवटची वेळ होती.

2 कसोटी सामन्यांनंतर भारत आणि वेस्ट इंडिजचे संघ 3 वनडे आणि 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिकाही खेळणार आहेत. 27 जुलै गुरुवारपासून एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. यानंतर 3 ऑगस्ट, गुरुवारपासून टी-20 मालिका सुरू होईल. टीम इंडिया या दौऱ्यातील शेवटचा सामना 13 ऑगस्ट, रविवारी फ्लोरिडामध्ये खेळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com