FIFA World Cup Qualifiers : भारत-अफगाणिस्तानची गोलशून्य बरोबरी; सुनील छेत्रीच्या संघाने वर्चस्व मिळवूनही संधी गमावल्या

फिफा विश्वकरंडक गट ‘अ’ पात्रता फुटबॉल स्पर्धेत भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. दोन्ही संघांना मिळालेल्या संधीचा फायदा घेता आला नाही.
FIFA World Cup Qualifiers
FIFA World Cup QualifiersSakal

अभा (सौदी अरेबिया) : फिफा विश्वकरंडक गट ‘अ’ पात्रता फुटबॉल स्पर्धेत भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. दोन्ही संघांना मिळालेल्या संधीचा फायदा घेता आला नाही.

दोन्ही संघांची ताकद समसमान वाटत होती. तरीही पहिल्या अर्धात गोल करण्याच्या दोन संधी मनवीर सिंगला मिळाल्या होत्या; परंतु त्यावर यश मिळवता आले नाही. हा सामना गोलशून्य बरोबरीत सुटला असला तरी भारतीय संघ ‘अ’ गटात दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.

तीन सामन्यांतून चार गुणांची कमाई केली आहे; तर अफगाणचा संघ चौथ्या स्थानावर घसरला आहे. कतारने कुवेतचा पराभव केल्यामुळे ते अर्थातच पहिल्या क्रमांकावर आहेत, तर कुवेतला भारतानंतरचे स्थान आहे.

अफगाणचे खेळाडू आपल्या शारीरिक ताकदीचा वापर करत होते, तर भारतीय खेळाडूंचा भर चेंडू पास करण्यावर होता. भारतीय संघात प्रथमच स्थान मिळालेल्या विक्रम प्रताप सिंगने चपळता दाखवत अफगाणच्या बचाव क्षेत्रावर चांगले आक्रमण केले होते. त्यामुळे अफगाण संघाचा बचाव अधूनमधून अस्थिर होत होता.

दोन्ही संघांकडून चांगल्या आक्रमक चाली रचल्या जात होत्या; परंतु स्ट्रायकर त्याचे रूपांतर गोलात करू शकत नव्हते. परिणामी मैदानाबाहेर असलेले दोन्ही संघांचे प्रशिक्षक इगोर स्टिमॅक आणि अॅशले वेस्टवूड आपापल्या खेळाडूंवर ओरडताना दिसत होते.

आक्रमणावर अधिक भर असलेल्या भारताकडून १७ व्या मिनिटालाच गोल केला जाऊ शकला असता. मनवीरचा हा प्रयत्न मात्र फोल ठरला. सुरुवातीला आक्रमण-प्रतिआक्रमणाच्या फैरी झडल्यानंतर भारताच्या मधल्या फळीने चेंडूवरील ताबा अधिक नियंत्रित केला. लालिन्झुआला चंगटे याने मनवीरकडे अचूक पास दिला;

परंतु मनवीरने गोल पोस्टच्या दिशेने मारलेला चेंडू वाईड गेला. एकीकडे भारताचे नियंत्रण असल्याचे वाटत असताना अफगाणिस्ताननेही आपल्यासाठी संधी निर्माण केली होती. भारत आणि अफगाणचे संघ आता गुवाहाटीमध्ये येतील. तेथे २६ तारखेला त्यांचा दुसरा सामना होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com