Ind vs Aus : बदला...! वर्ल्ड कप हुकला पण टी-20 मालिकेत टीम इंडियाचा ट्रॉफीवर कब्जा, मालिका 4-1ने खिशात

Ind vs Aus : बदला...! वर्ल्ड कप हुकला पण टी-20 मालिकेत टीम इंडियाचा ट्रॉफीवर कब्जा, मालिका 4-1ने खिशात

India vs Australia : आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 मध्ये भारतीय संघाचा प्रवास खूपच नेत्रदीपक राहिला होता. टीम इंडियाने वर्ल्ड कपच्या साखळी सामन्यांमध्ये एकही सामना हरला नव्हता आणि अंतिम फेरी गाठली. पण अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव केला.

पण वर्ल्ड कप 2023 मधील पराभवाचा बदला भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्याच्या टी-20 मालिकेत घेतला. भारतीय संघाने 4-1 मालिका खिशात घेतली. बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या शेवटच्या टी-20 सामन्यात भारताने सहा धावांनी जिंकला.

बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 20 षटकांत आठ विकेट गमावत 160 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला 20 षटकांत आठ गडी गमावून केवळ 154 धावा करता आल्या.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. आणि भारतीय संघाची सुरुवातही चांगली झाली होती. पहिल्या तीन षटकात सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड खूपच आक्रमक दिसत होता. पण 4.3 षटकांत 33 धावांवर जोडी तोटली. यशस्वी जैस्वालने 15 चेंडूत 21 धावा करून आऊट झाला त्याने या खेळत 1 चौकार आणि 2 षटकार मारले. पण चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करू शकले नाही. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फने जैस्वालला आपला शिकार बनवले.

यानंतर भारतीय फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. 55 धावांपर्यंत भारताचे 4 खेळाडू पॅव्हेलियनमध्ये गेले होते. मात्र, श्रेयस अय्यर आणि जितेश शर्माने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण जितेश शर्माने 16 चेंडूत 24 धावा करून तंबूत गेला. आरोन हार्डीने जितेश शर्माला आपला शिकार बनवले.

भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवशिवाय ऋतुराज गायकवाड आणि रिंकू सिंग स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. मात्र, अक्षर पटेलने 21 चेंडूत 31 धावांची उपयुक्त खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 2 चौकार आणि 1 षटकार मारला. ऑस्ट्रेलियाकडून जेसन बेहरेन्डॉफ आणि बेन द्वारशुईस यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. याशिवाय आरोन हार्डी, नॅथन एलिस आणि तन्वीर संघाने प्रत्येकी 1 बळी घेतला.

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला 20 षटकांत आठ गडी गमावून केवळ 154 धावा करता आल्या. बेन मॅकडरमॉटने सर्वाधिक 54 धावा केल्या, मात्र तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. ट्रॅव्हिस हेडने 28 आणि मॅथ्यू वेडने 22 धावा केल्या. या तिघांशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला 20 धावांचा पल्ला गाठता आला नाही.

टीम डेव्हिड 17 धावा करून बाद झाला तर मॅथ्यू शॉर्ट 16 धावा करून बाद झाला. अॅरॉन हार्डीला केवळ सहा धावा तर जोश फिलिपला केवळ चार धावा करता आल्या. भारताकडून मुकेश कुमारने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. अक्षर पटेलने एक विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com