भारताचा दोन गोलांनी पराभव ; एएफसी आशिया फुटबॉल : बलाढ्य ऑस्ट्रेलियाची सरशी

२०११ मधील या स्पर्धेत भारताचा गट साखळीत ऑस्ट्रेलियाकडून ०-४ असा पराभव झाला होता. त्यातुलनेत आजची कामगिरी उंचावलेली होती.
भारताचा दोन गोलांनी पराभव ; एएफसी आशिया फुटबॉल :  बलाढ्य ऑस्ट्रेलियाची सरशी

अल रायन (कतार) : बलाढ्य तसेच माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान ५० मिनिटे थोपवून धरणाऱ्या भारताचा बचाव त्यानंतर भेदला गेला. एएफसी आशिया करंडक फुटबॉल स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने सलामीलाचा भारताचा २-० असा पराभव करून आपले वर्चस्व सिद्ध केले.

जागतिक फुटबॉल क्रमवारीत २५व्या स्थानावर असलेला ऑस्ट्रेलियाचा ब गटातील या सामन्यात विजय निश्चित मानला जात होता, परंतु इगोल स्टिमॅक यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पूर्वार्धापर्यंत ऑस्ट्रेलियाला गोल करण्यापासून रोखून धरले होते. उत्तरार्धात पाच मिनिटानंतर मात्र संयम कमी झाला आणि दोन गोल स्वीकारले. जागतिक क्रमवारीत भारत १०२व्या स्थानावर आहे.

२०१५ मध्ये या स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियाकडून जॅकसन इर्विन (५० वे मिनिट) आणि जॉर्डन ब्रोस (७३ मि.) यांनी गोल केले. २०११ मधील या स्पर्धेत भारताचा गट साखळीत ऑस्ट्रेलियाकडून ०-४ असा पराभव झाला होता. त्यातुलनेत आजची कामगिरी उंचावलेली होती.

आजच्या सामन्यातील दोन गोलांनी झालेला पराभव काही तितकासा निराशा करणारा ठरणार नाही. गोलसरासरी फार कमी होणार नाही आणि त्याचा फायदा गटातून पुढच्या फेरीस पात्र ठरणाऱ्या तिसऱ्या संघात स्थान मिळवता होऊ शकेल. गटातील चारपैकी पहिले दोन संघ थेट पुढच्या फेरीत प्रवेश करतील त्यानंतर सहा गटांमधून सर्वोत्तम तीन संघांना पुढच्या फेरीत प्रवेश मिळणार आहे.

ऑस्ट्रेलियाला तांत्रिक आणि त्यांच्या आक्रमक खेळासमोर तग धरायचा असेल तर भक्कम बचाव करायला लागेल, अशी सुचना स्टिमॅक यांनी सामन्याअगोदर भारतीय खेळाडूंना केली होती त्यानुसार भारतीयांनी पूर्वार्धात खेळ केला. कर्णधार सुनील छेत्रीसह ११ खेळाडू बचावात सहभागी होत होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियावर आक्रमण करण्यासाठी त्यांच्या अर्धात भारतीय खेळाडू अपवादानेच दिसत होता. अशातच १६ व्या मिनिटाला एक सुवर्ण संधी मिळाली, छेत्रीने मारलेला हेडर गोलजाळ्याचा थोडा बाजूने गेला.

४५ हजार क्षमतेच्या स्टेडियममध्ये सर्वाधिक भारतीय होते त्यामुळे भारताच्या प्रत्येक प्रयत्नांना चांगला पाठींबा मिळत होता. छेत्रीनंतर भारताचा हुकमी खेळाडू संदेश जिंगनच्या कपाळावर दुखापत झाली. रक्तस्त्राव झाला तरी बँडेल लावून तो खेळत राहिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com