esakal | IND vs ENG: वाद शमेना... इंग्लंड क्रिकेट बोर्डाचं ICCला पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs ENG

IND vs ENG: वाद शमेना... इंग्लंड क्रिकेट बोर्डाचं ICCला पत्र

sakal_logo
By
विराज भागवत

कोविडमुळे पाचव्या कसोटीत खेळण्यास भारतीय खेळाडूंचा नकार

Ind vs Eng 5th Test: भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कोरोना रिपोर्ट चौथ्या कसोटीदरम्यान पॉझिटिव्ह आला. त्यानंतर पाचव्या कसोटीआधी सराव सत्रात खेळाडूंसोबत असणाऱ्या ज्युनियर फिजिओ योगेश परमार यांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला. त्यामुळे खेळाडूंनी भीतीपोटी सामना खेळण्यास नकार दिला आणि पाचवी कसोटी अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आली. ब्रिटीश प्रसारमाध्यमांनी या प्रकरणाला वेगळाच रंग दिला. IPL ला अधिक महत्त्व देण्याच्या उद्देशाने खेळाडूंनी ही कसोटी रद्द करायला लावली असा आरोपच त्यांनी केला. या दरम्यान, BCCI ने इंग्लंड क्रिकेट बोर्डाला हा सामना पुन्हा काही काळाने आयोजित करा असं सांगितलं होतं. पण इंग्लंड-भारत क्रिकेट बोर्डातील वाद शमण्याची चिन्हे नाहीत. तशातच आता इंग्लंड क्रिकेट बोर्डाने थेट ICCला पत्र लिहिल्याचे वृत्त पीटीआयने दिलं आहे.

हेही वाचा: IND vs ENG: "त्यांना नावं ठेवण्याआधी तुम्ही काय केलंत ते आठवा"

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ओल्ड ट्रॅफर्डवर नियोजित असलेल्या पाचव्या कसोटीचं भवितव्य काय असावं हे ठरवण्याचा निर्णय घेण्यासाठी थेट अधिकृतरित्या ICC ला पत्र पाठवलं आहे. त्यामुळे दोन क्रिकेट बोर्डामधील वाद शांतपणे शमत नसल्याचे चित्र आहे. आम्ही ICC ला पत्र लिहून या सामन्याबद्दलच्या निर्णयाबद्दल विचारलं आहे, असं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे प्रवक्ते यांनी पीटीआयला सांगितलं. ICCच्या विवाद निवारण समितीने (ICC's Dispute Resolution Committee) या प्रकरणात लक्ष घालावं आणि सामना कोविडमुळे रद्द झाल्याचे जाहीर करावे. तसे झाल्यास इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा पाचव्या सामन्याच्या नियोजनासाठी जो ४० मिलियन पौंडचा खर्च झाला आहे, त्याच्या विम्यासाठी अर्ज करता येईल, अशी इंग्लंड क्रिकेट बोर्डाची मागणी आहे. कारण, ICCने भारताच्या बाजून निर्णय दिला तर ECB ला ४० मिलियन पौंडांचे नुकसान होईल आणि त्या नुकसानीची भरपाई कोविड विम्यातही मिळणार नाही.

हेही वाचा: "इंग्लंड क्रिकेट बोर्डाने तेव्हा काय केलं होतं विसरू नका"

"भारतीय चमूतील काहींना कोरोनाची बाधा झाल्याने पाचवा कसोटी सामना रद्द करण्यात आला आहे. पण हा कसोटी सामना दोन्ही संघातील खेळाडूंच्या सोयीनुसार पुनर्नियोजित करावा अशी विनंती आम्ही ECB ला केली आहे. BCCI आणि ECB यांच्यातील व्यावहारिक संबंध सलोख्याचे आहेत. त्यामुळे ही विनंती करण्यात आली आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना खेळण्याचा योग्य कालावधी कोणता असावा, याबद्दल दोन्ही क्रिकेट बोर्डांच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा होईल. खेळाडूंची सुरक्षा आणि सुरक्षितता याला BCCI ने कायमच प्राधान्यक्रम दिला आहे. त्यामुळे सामन्याबाबत निर्णय घेण्यात आला", असे BCCIच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

loading image
go to top